धावत्या रिक्षाचा टायर बदलला, ‘खतरनाक’ स्टंट करणार्‍या पोराचं सोशलवर ‘कौतुक’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया म्हणजे सध्या सर्वसामान्य लोकांसाठी मोठे व्यासपीठ ठरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ टाकून अनेकजण प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये कोणी कॉमेडी व्हिडीओ करतो तर कोणी वेगवेगळे स्टंट करतो. अनेक लोकांना आपले व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकदा मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

सोशल मीडियावर नुकताच एका रिक्षाच्या स्टंटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षात बसलेला स्टंट मॅन चालू रिक्षामध्ये रिक्षाचा टायर बदलतो. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रिक्षाचा टायर खराब होतो रिक्षा चालवणारा पुढील एक चाक आणि डाव्या बाजूचे एक चाक अशा दोन चाकांवर रिक्षा चालवत असतो तर रिक्षात बसलेला दुसरा व्यक्ती मागून आलेल्या रिक्षावाल्याकडून एक स्टेपनी घेतो आणि रिक्षा एका बाजूला कललेली असल्यामुळे टायर बसवू लागतो. मागे दुचाकीवर असलेल्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये काहींनी हा व्हिडीओ विदेशातील असल्याचे सांगितले आहे तर काहींनी असा प्रयोग न करण्याचा सल्ला दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like