‘आधार’कार्ड ‘अपडेट’ करण्याचे नियम बदलले, ‘नाव-जन्म तारीख-मोबाइल नंबर’मध्ये आता बदल ‘असे’ होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या मोबाईलच्या सीमकार्डसाठी, बँक खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी, अशा विविध कामांसाठी आधार कार्ड सर्वात जरूरी झाले आहे. सध्या जवळपास सर्वांकडेच आधार कार्ड आहे. परंतु, प्रत्येक तिसर्‍या व्यक्तीच्या आधारमध्ये काही ना काही चूक झालेली आहे. कुणाच्या नावात, कुणाच्या जन्म तारखेत, कुणाचा आई-वडीलांच्या नावात चूक झाल्याचे आढळून येत आहे. या चूका दुरूस्त करणे खुप त्रासदायक ठरते. हा त्रास कमी करण्यासाठी युआयडीएआयने आधार कार्डमध्ये दुरूस्ती किंवा बदल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कमी केली आहेत.

युआयडीएआयने आधार कार्डमध्ये दुरूस्ती करण्यासाठी काही नवीन निर्णय घेतले आहेत. यामध्ये तुम्हाला दोन नव्या संधी मिळतात. आता तुम्ही आपल्या आधार कार्डात दुरूस्ती करण्यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदार आयडी, ड्राइव्हिंग लायसन्स, सरकारी क्षेत्रांकडून जारी जारी कंपन्यांचे ओळखपत्र, शैक्षणिक संस्थाचे लेटर हेड, शस्त्र परवाना, जात किंवा रहिवाशी प्रणामपत्र, पेन्शन फोटो कार्ड, यापैकी कोणतेही एक डॉक्यूमेंट दाखवू शकता. या सर्व कागदपत्रांद्वारे कोणत्याही एका कागदपत्राद्वारे तुम्ही आपल्या नावात बदल करू शकता.

जर तुम्हाला आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, किंवा तुम्ही त्यामध्ये बदल करू इच्छिता तर तुम्ही जवळच्या आधार केंद्रात जाऊन कोणत्याही डॉक्युमेंटशिवाय तुमचा नंबर बदलू शकता किंवा लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.