सर्वसामन्यांना फटका ! 1 एप्रिलपासून ‘या’ वस्तू महागणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोनामुळे अगोदरच लोंकाची परिस्थिती डबगायला आली असतानाच उद्या १ एप्रिल २०२१ नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. या महिन्यात अनेक वस्तू महागणार असल्याचे पुढं आले आहे. उद्यापासून अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोंकाना या महागाईचा फटका जोरात बसणार आहे. तर यामध्ये कुठल्या वस्तूंचे दर वाढणार आहे ते जाणून घ्या.

तर १ एप्रिलपासून वाढणारे दर म्हणजे मारुती सुजुकी आणि अनेक वाहन कंपन्याचे कार आणि दुचाकीचे दरात वाढ होणार आहे. तर मारुती सुजुकीसह Nissan आणि रॅनो या गाड्याही महागणार आहेत. तसेच दुचाकीमध्ये हिरो कंपनीच्या गाड्या, ट्रॅक्टरच्या किंमती वाढणार आहेत. तर चीनमधून आयात वस्तूंवर बंदी आणल्यानंतर टेलिव्हिजन (TV) चे दर हे २ हजार ते ३ हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. तसेच मोबाईल फोन, एसी, फ्रिज तर एसीच्या दरात दीड ते दोन हजार पर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पेत इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर इंपोर्ट ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली. ज्यामध्ये मोबाईल पार्टस, चार्जर, एडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोन यांचा समावेश आहे. इंपोर्ट ड्यूटी वाढल्याने मोबाईलचे दरही वाढणार आहे. नागरी विमान महासंचलनालयने एअर सिक्युरिटी शुल्क वाढवण्याची घोषणा केल्याने विमान प्रवासही वाढणार आहे. यामध्ये देशातंर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअरपोर्ट सिक्युरिटी शुल्क म्हणून २०० रुपये तर परदेशी प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागणार आहे. तसेच गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये ओपन सेल पॅनेलचे दर ३५ टक्क्यांनी वाढले होते.

१ एप्रिलपासून विमा कंपन्यांनी विमा प्रिमीयम महाग करण्याची ठरवले आहे. यावेळी प्रिमीयममध्ये १०-१५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. स्टील बनवण्याच्या कंपन्या दरात वाढ करणार आहे.. JSW Steel, JSPL, M-NS आणि Tata Steel, HRC या कंपन्या ४००० रुपये टनामागे वाढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०२० डिसेंबर महिन्यात टनामागे २५०० रुपये वाढले होते. दरम्यान, १ एप्रिल महिन्यापासून उत्तर प्रदेशात दारूच्या किंमतीत वाढ होईल. नव्या किंमतीने दारू विक्री होईल. देशी आणि विदेशी दोन्ही दारूच्या किंमती वाढतील. मात्र बियर स्वस्त होतील. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश शासनाने परमिट शुल्क वाढवण्याची घोषणा केलीय.