Changes From 1st August | 1 ऑगस्टपासून बदलतील दैनंदिन जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम, तुमच्यावर होईल थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : 1 ऑगस्टपासून तुमच्या जीवनाशी संबंधीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ICICI बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या नियमात बदल करणार आहे. याशिवाय 1 ऑगस्टपासून (Changes From 1st August) स्वयंपाकाच्या गॅसच्या नवीन किंमती सुद्धा जारी होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या बजेटवर पडतो. 1 ऑगस्टपासून (Changes From 1st August) कोणत्या नियमात बदल होणार आहेत ते जाणून घेवूयात…

Changes From 1st August cash withdrawal rules to lpg cylinder price update check details here

1. ICICI Bank चे बदलतील हे नियम

1 ऑगस्टपासून या बँकेच्या एटीएममधून कॅश काढणे महागणार आहे. सोबतच चेकबुकच्या नियमात सुद्धा बदल होणार आहेत. ही बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रांजक्शन देते.

– 4 वेळ पैसे काढल्यानंर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. तसेच रेग्युलर सेव्हिंग अकाऊंटसाठी ICICI Bank दरमहिना 4 कॅश ट्रांजक्शन फ्री देते.

– फ्री लिमिटनंतर प्रत्येक ट्रांजक्शनवर 150 रुपये द्यावे लागतील.

– 1 ऑगस्टपासून ग्राहक आपल्या होम ब्रँचमधून एक लाख रुपये काढू शकतात.

– यापेक्षा जास्त झाल्यास 5 रुपये प्रति 1,000 वर द्यावे लागतील.

– होम ब्रँचशिवाय दुसर्‍या ब्रँचमधून पैसे काढल्यास प्रतिदिन 25,000 रुपयांपर्यंत कॅशन काढल्यास चार्ज नाही.

– त्यानंतर 1000 रुपये काढल्यास 5 रुपये द्यावे लागतील.

– 25 पेजचे चेकबुक फ्री असेल.

– यानंतर 20 रुपये प्रति 10 पानांच्या अतिरिक्त चेकबुकसाठी द्यावे लागतील.

2. एक ऑगस्टपासून बँक हॉलिडे असेल तरी मिळेल सॅलरी

2021 पासून रविवार किंवा इतर बँक हॉलिडे असला तरीसुद्धा तुमची सॅलरी, पेन्शन, डिव्हिंडंट आणि इंटरेस्टचे पेमेंट थांबणार नाही, म्हणजे ठरलेल्या तारखेला सॅलरी आणि पेन्शन मिळेल.

– कारण, रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (National Automated Clearing House- NACH) आठवड्याच्या सातही दिवस उपलब्ध होईल.

– एनएसीएचद्वारे संचालित NACHच्या माध्यमातून बल्क पेमेंट जसे की सॅलरी, पेन्श, व्याज, डिव्हिडंट इत्यादी पेमेंट होते.

– 1 ऑगस्टपासून ही सुविधा 7 दिवस 24 तास मिळेल.

3. सिलेंडरच्या नवीन किंमती होतील जारी

1 ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होईल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि कमर्शियल सिलेंडरच्या नवीन किंमती ठरवल्या जातात.

हे देखील वाचा

Kanpur News | अबब ! रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची विक्री करणारे 256 लोक निघाले ‘करोड’पती, आयकर आणि GST तपासणीत माहिती उघड

Raj Kundra | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीज तयार करून कमावले कोट्यवधी रुपये

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Changes From 1st August cash withdrawal rules to lpg cylinder price update check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update