1 जुलैपासून बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम ! खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सर्वसामान्य माणसाशी संबंधीत काही असे नियम आहेत जे 1 जुलै (1 July) 2021 पासून बदलणार आहेत. ज्याच्या तुमच्या खिशावर आणि घराच्या बजेटवर थेड परिणाम होणार आहे. 1 जुलै(1 July) पासून कोण-कोणत्या नियमात बदल होणार आहेत ते सविस्तर जाणून घेवूयात…

  • स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती (Cooking gas)

1 जुलैला (1 July) LPG सिलेंडर म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या नवीन किमती जारी होतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ठरवतात. जुलैमध्ये घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या किमती किती वाढणार हे पहावे लागेल.

  • SBI चे बदलणार नियम

एसबीआय BSBD खातेेधारकांना चारवेळा फ्री कॅश काढण्याची सुविधा देते. हे लिमिट संपल्यानंतर बँक ग्राहकांकडून चार्ज वसूल करते. ATM मधून रोकड काढल्यास बँक 15 रुपयांसह जीएसटी चार्ज सुद्धा वसूल करते. याशिवाय कोरोना संकटात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी कॅश काढण्याची मर्यादा वाढवली आहे. ग्राहक आपल्या बचत खात्यातून दुसर्‍या ब्रँचमध्ये जाऊन विड्रॉल फॉर्मद्वारे 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता आणि चेकने दुसर्‍या ब्रँचमधून 1 लाख रुपयांपर्यंत काढता येऊ शकतात.

  • एसबीआय चेकबुक शुल्क (SBI Check Book Fee)

SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शियल वर्षात 10 चेकची कॉपी दिली जाते. आता 10 चेकच्या चेकबुकवर ग्राहकांना शुल्क द्यावे लागेल.
आता BSBD बँक खातेधारकांना 10 चेक लीवसाठी 40 रुपयांसह GST चार्ज द्यावा लागेल, तर 25 चेक लीवसाठी 75 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल.
इमर्जन्सी चेकबुकच्या 10 लीव साठी 50 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागेल. मात्र, बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी चेकबुकवर नवीन सर्व्हिसमधून सूट दिली आहे. बँक बीबीएसडी खातेधारकांद्वारे घर आणि आपल्या किंवा बँकेच्या इतर ब्रँचमधून पैसे काढण्यावर शुल्क घेणार नाही.

इन्कम टॅक्स (Income tax)

टॅक्सपेयर्ससाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. 30 जूनपूर्वी आपला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा. अन्यथा 1 जुलैपासून टॅक्सपेयर्सला जास्त टीडीएस भरावा लागू शकतो.
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर केली आहे.

  • कॅनरा बँकेचा IFSC code (Canara Bank)

सिंडिकेट बँक ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत विलीनीकरण झाले आहे.
यासाठी आता 1 जुलैपासून बँकेचा आयएफसी कोड बदलणार आहेत. अशावेळी सिंडिकेट बँकेच्या शाखांचे सध्याचे आयएफसी कोड 30 जून 2021 पर्यंत काम करतील.
नंतर नवीन कोड लागू होतील.

Web Titel : changes from 1st july 2021 check sbi transaction lpg price income tax new rules know about it

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा