ICC World Cup 2019 : IND Vs BAN मॅचनंतर ‘टीम इंडिया’ची ICC वनडे रॅकिंग बदलली, झालं मोठं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. भारताने कालच्या सामन्यात बांगलादेशला २८ धावांनी पराभूत करत धमाकेदार प्रवेश केला. त्यानंतर काल आयसीसीने नवीन एकदिवसीय रँकिंग जाहीर केले. यामध्ये भारताला एका स्थानाचा फटका बसला आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला एका गुणाचा फटका बसला आहे तर इंग्लंडला एका गुणाचा फायदा झाला आहे. बांग्लादेशबरोबर झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाला एकदिवसीय क्रमवारीत फटका बसून भारतीय संघ आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ताज्या एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड सध्या १२३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून १२२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आयसीसीने जाहीर केलेली ताजी क्रमवारी

१) इंग्लंड
२) भारत
३) न्यूझीलंड
४) ऑस्ट्रेलिया
५) दक्षिण आफ्रिका
६) पाकिस्तान
७) बांगलादेश
८) श्रीलंका
९) वेस्ट इंडिज
१०) अफगाणिस्तान

दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघ पुढील सामन्यांत कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यानंतर सेमीफायनलमध्ये विजय मिळवला तर भारतीय संघ या क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येईल. त्यामुळे आता पुढील सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली