SBI च्या व्याजदरात बदल, होम लोनवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील आणि देशा बाहेरील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने व्याजदरात बदल केला आहे. एसबीआयने केलेल्या या बदलाचा परिणाम होम लोन आणि फिक्स डिपॉझिटवर होणार आहे. बँकेने काही दिवसांपूर्वी आपल्या व्याज दरात बदल केले होते. बचत खात्यात एक लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्या रक्कमेवर ३.५० टक्क्याहून घटवून ३.२५ टक्के केला. याशिवाय एफडीच्या व्याजदारात देखील बदल करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या रोपोरेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयने ठेवी आणि कर्जाच्या व्याज दरावर परिणाम झाला आहे.

एसबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता बचत खात्यावर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे. याचा परिणाम ९५ टक्के ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदारात ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली. यानंतर एसबीआयसह इतर बँकांनी कर्जावरील व्याज दरात बदल केले. एसबीआय आणि इतर बँकांनी कर्जावरील व्याज दरात ०.०५ टक्के अशी किरकोळ कपात केली.

एसबीआय बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लँडिंग रेट (MCLR) मध्ये बदल केला. बँकांचे व्याज दर निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेली पद्धती म्हणजे एमसीएलआर. यामुळे ग्राहकांना कमी व्याज दराचा फायदा होतो. MCRL मुळे ग्राहकांना व्याज दर प्रक्रियेत पारदर्शकता आणि कर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like