पोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी परीक्षेत मोठे बदल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहे. हे बदल उमेद्वारांच्या हितासाठी बदलण्यात आले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत पुलअप्स आणि लांब उडी वगळ्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पुलअप्स आणि लांब उडीसाठी २० मार्क देण्यात येत होते.

यापूर्वी शारीरिक चाचणी परीक्षा महिला आणि पुरुष उमेद्वारांसाठी १०० गुणांची होती. आता ती ५० गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणी परीक्षा देण्यासाठी लेखी परीक्षेत किमान ३५ गुण खुल्या प्रवर्गासाठी तर मागास प्रवर्गातील उमेद्वारांनी ३३ टक्के गुणांनी पास होणे गजरचे आहे.

शारीरिक चाचणी परीक्षेतील बदल

पुरुष उमेद्वारांसाठी

१६०० मीटर धावणे – ३० गुण (पूर्वी ५ किमी धावणे २० गुण)

१०० मीटर धावणे – १० गुण (पूर्वी १०० मीटर धावणे-२० गुण)

गोळा फेक – १० गुण (पूर्वी गोळा फेक – २० गुण)

यंदा पुल अप्स आणि लांब उडी परीक्षा होणार नाही. पूर्वी या परिक्षांसाठी अनुक्रमे २० आणि १० गुण होते.

महिला उमेद्वारांसाठी

८०० मीटर धावणे- ३० गुण (पूर्वी ३ किमी धावणे -२५ गुण)

१०० मीटर धावणे – १० गुण (पूर्वी १०० मीटर धावणे – २५ गुण)

गोळा फेक – १० गुण (पूर्वी गोळा फेक (४ किलो) – २५ गुण)

डिसेंबर २०१९ मध्ये होणारी पोलीस भरती नव्या नियमानुसार होणार आहे. या बदलामुळे उमेद्वारांना दिलासा मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like