‘आरटीआय’मधील बदलातून जनतेचे अधिकार कमी करण्याचा धोका : अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय माहिती अधिकारात करण्यात आलेल्या बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार आहे, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोदी सरकारने दोन दिवसांपूर्वी लोकसभेत माहिती अधिकार कायद्याच्या दुरुस्तीसाठी विधेयक मंजूर करून घेतले. २००६ मध्येच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आपण आंदोलन केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर माहिती अधिकार कायदा पूर्ववत करण्यात आला होता.

आता माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत आणण्यात आणले आहे. नवीन दुरुस्तीमुळे माहिती आयुक्तांचे अधिकार कमी होणार आहेत, असेही हजारे म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त