मुंबई SRPF मधून राज्य पोलिस दलात बदलीसाठीच्या व प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑलनइान – मुंबई राज्य राखीव पोलिस बदलातून (एसआरपीएफ) राज्य पोलिस दलात बदलीसंदर्भात व प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (बुधवार) घेतला आहे. या बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मुंबई राज्य राखीव पोलिस बलातून राज्य पोलिस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची 15 वर्षांची अट शिथील करून ती 12 वर्ष करण्याचा व प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. तसेच बदली झाल्यानंतर पहिली 5 वर्ष जिल्हा पोलिस मुख्यालयात कर्तव्य करावे लागत होते. त्यामध्ये आता बदल करून सदरचा कालावधी हा 2 वर्षाचा करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभुमीवर सद्यस्थितीचा आढावा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी आज वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत घेतला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित पोलिस अधिकार्‍यांना दिल्या आहेत.