सरकारी कर्मचार्‍यांच्या ‘रिटायरमेंट’च्या वयात बदल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 32 वर्ष सेवा बजावल्यानंतरही अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वेतनात इतक्या प्रमाणात वाढ केली जात नाही. मात्र 60 वर्ष सेवा बजावल्यानंतर त्याचा कनिष्ठ कर्मचा-यांना पदोन्नतीत मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आता प्रशासन कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीच्या वयात बदल करण्याच्या विचारात आहे.

सरकारी नोकरीत 33 वर्ष सेवा बजावणा-यांना सेवानिवृत्ती दिली जाणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे. तसेच ज्या कर्मचा-याचे वय जवळपास 60 वर्ष असेल, त्यांचाही यामध्ये समावेश आहे.

सुरक्षा दलाला बसू शकतो फटका
सरकारच्या या निर्णयाचा फटका सुरक्षा दलाला अधिक बसू शकतो. कारण लष्कर आणि सुरक्षा दलात 22 वर्षात जॉईनिंग केली जाते. त्यामुळे 33 वर्षाची सेवा तो 55 वर्षातच पूर्ण करत आहे. सातव्या वेतन आयोगातही याचा उल्लेख केला असल्याचा दावा सरकारने केला आहे.

सेवानिवृतीचे वय घटवण्यात आल्याचा निर्णय लागू केला तर, बॅकलॉगची समस्या देखील दूर होईल, असा दावा सरकारकडून करण्यात येतोयं. त्यामुळे नवीन भरती ही लवकरात लवकर केली जाऊ शकते. तसेच अनेक तरतुदींचा विचार देखील केला जाणार असून अर्थ मंत्रालयाच्या संमतीनंतरच सेवानिवृत्तीचे वय घटवणार असल्याचे समजते.

31 जानेवारी 2019 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त अधिकारी देव शर्माच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सांगितले होते की, केंद्रीय सुरक्षा दलात सेवानिवृत्तीचे वय हे समान असावे, यासंदर्भात गृह मंत्रालयाने चार महिन्यात उत्तर द्यावे, असे आदेश काढले होते. मात्र यावर कोणतेही उत्तर न देता आहे तेच सुरु आहे. जवान 57 वर्षातच सेवानिवृत्त होतायेत.

33 वर्ष सेवा किंवा 60 वर्ष वय असलेल्यांना सेवानिवृत्ती देण्याचा लाभ इतर कर्मचा-यांना देखील होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोयं. या योजनेमध्ये आयएएस, आयपीएसपासून केंद्रीय सरकारच्या सर्व श्रेणीतील नोक-यांचा समावेश आहे.

visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like