Motor Vehicle ACt मध्ये सरकारकडून बदल ! ‘असा’ होणार परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं (Ministry of Road Transport and Highways) मोटर व्हिकल नियमांमध्ये काही बदल-दुरुस्ती केली आहे. त्यामुळं आता वाहनाच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटमध्ये ओनरशिप डिटेल स्पष्टपणे जोडावे लागणार आहेत. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी हे नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. मोटर वाहन नियमांमध्ये केलेल्या दुरुस्तीचा फायदा दिव्यांगांना (Handicapped) होणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायनं दिलेल्या माहितीनुसार मोटार वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी जे फॉर्म दिले जात होते त्यात वाहनांच्या ओनरशिप डिटेल्स स्पष्टपणे नोंद होत नव्हती. ही बाब अनेकदा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर सेंट्रल मोटर व्हिकल नियम (Central Motor Vehicle ACt) 1989 च्या फॉर्म 20 मध्ये मंत्रालयानं दुरुस्ती केली आणि त्याबाबतचं नोटीफिकेशन 22 ऑक्टोबर 2020 रोजी जारी करण्यात आलं आहे. त्यामुळं आता वाहनांच्या रजिस्ट्रेशनवेळी ओनरशिप डिटेल्स स्पष्टपणे नोंदवणं आवश्यक असणार आहे.

ओनरशिप डिटेल्स वेग-वेगळ्या प्रकारात नोंद होतील

मोटर व्हिकल नियमांतील दुरूस्तीनंतर, वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये ओनरशिप डिटेल्स वेग-वेगळ्या श्रेणींमध्ये नोंदवले जातील. यात ऑटोनोमस बॉडी, सेंट्रल गव्हर्नमेंट, चॅरिटेबल ट्रस्ट, ड्रायव्हींग ट्रेनिंग स्कुल, दिव्यांगजण, एज्युकेशन इंस्टिट्युट, लोकल ऑथॉरिटी, मल्टीपल ओनर्स, पोलीस डिपार्टमेंट इत्यादी श्रेणी सामिल आहेत

दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ

सरकारकडून दिव्यांगांना मोटर व्हिकलची खरेदी, ओनरशिप आणि ऑपरेशनमध्ये विविध योजनांतर्गत जीएसटी आणि इतर सूट दिली जाते. सेंट्रल मोटर व्हिकल नियमांतर्गत आता ज्या डिटेल्सची नोंद होते, त्यात दिव्यांगांचा तपशील नोंदवला जात नाही. त्यामुळं दिव्यांग सरकारी योजनांचा (Government scheme) लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळं आता या दुरुस्तीनंतर ओनरशिप डिटेल्स स्पष्टपणे नोंदवले जाणार असून दिव्यांग विविध योजनांच लाभ घेऊ शकणार आहेत.