मुस्लीम मुक मोर्चादरम्यान पुण्यातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुस्लीम समाजाच्या मागण्यांसाठी रविवारी (दि.९) मुस्लीम समाजाच्यावतीने मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मुस्लीम समजातील हजारो लोक सहभागी होणार आहेत. या मोर्चाला गोळीबार मैदानापासून सकाळी दहा वाजता सुरुवात होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयजवळ याची समाप्ती होणार आहे. मोर्चा दरम्यान या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पुणे वाहतूक विभागाने शहरातील वाहतूक बदल केले आहेत. त्यामुळे या दिवशी वाहनचालकांनी देण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
[amazon_link asins=’B007IREFE0,B06XDKWLJH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2a47d2a-b354-11e8-b4c6-65f3a339d629′]

गोळीबार मैदानापसून सुरु होणारा मोर्चा शंकरशेठ रोड मार्गे – सेव्हन लव्ह चौकातून उजवीकडे वळून नेहरु रोडने सोनावणे हॉस्पीटल रामोशीगेट संत कबीर चौक पावर हाऊस चौक मालधक्का चौक ससून चौक बाबासाहेब आंबेडकर पुतळा साधू वासवानी चौक मार्गे विभागीय आयुक्त कायार्यालय येथे येणार असून येथेच मोर्चाची समाप्ती होणार आहे.

बंद मार्ग व पर्यायी मार्ग खालील प्रमाणे
१) गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा मोर्चाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडेवळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाणे.
[amazon_link asins=’B00N78RZO6,B00GASLORE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9273489-b354-11e8-909e-771bf0083cb3′]

२) सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक मोर्चाच्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग – लुल्लानगरकडून येवून खान्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगाल चौक – नेपीयर रोड – मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक – भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जाणे.

३) सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक मोर्चाचे काळात पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे डायवर्शन करुन पुढे इच्छित स्थळी किंवा नेपीयर रोडने पुढे सीडीओकडे जाणे.

जाहिरात

४) भैरोबानाला ते गोळीबारकडे जाणारी वाहतुक भैरोबानाला येथे बंद करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग – प्रिन्स ऑफ वेल रोडने किंवा भैरोबानाला – वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळी

५) कोंढवा परीसरातून गोळीबारकडे येणाऱ्या सर्व जड माल वाहतुक वाहने, प्रवासी वाहतुक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्य़ायी मार्ग – सदर वाहनांनी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकाकडून इच्छित स्थळी जाणे.

६) जेधे चौक ते गोळीबार मैदान चोकाकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – जेधे चौकातून मार्केटयार्ड चौक – वखार चौक ते गंगाधाम चौक मार्गे (सोलापूर रोडकडे जाण्याकरीता)

७) मार्केटयार्ड चौक ते सेव्हन लव्हज चौक
पर्यायी मार्ग – डासस प्लॉट चौक ते व्होल्गा चौक – स्वारगेट

८) स्वेहन लव्हज चौक ते मालधक्का चौक (नेहरुनगर) पर्यंत बंद
पर्यायी मार्ग – सेव्हन लव्हज चौक – जेधे चौक इच्छितस्थळी

९) लक्ष्मीरोड नानापेठ पोलीस चौकी ते संतकबीर चौक
पर्यायी मार्ग – दारुवालापुल पुणे शाहीर अमर शेख चौक इच्छितस्थली

जाहिरात

१०) अपोलो ते पावर हाऊस चौक
पर्यायी मार्ग – दारुवालापुल पुणे शाहीर अमर शेख चौक इच्छितस्थळी

११) बॅनर्जी चौक ते पावर हाऊ चौक
पर्यायी मार्ग – दोराबजी चौकातून ब्ल्यु नाईल हॉटेल चौक उजवीकडे वळून इच्छितस्थली जाणे

१२) शाहीर अमर शेख चौक
पर्यायी मार्ग – शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आरटीओ चौकातून जहाँगीर जौकाकडे जाऊन इच्छितस्थळी जाणे

१३ ) अलंकार चौक
पर्यायी मार्ग – अलंकार चौकाकडून साधू वासवानी चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे स्टेशन व जहाँगीर चौकाकडे जाणे
[amazon_link asins=’B00GO0HY68,B06VVS7S94′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09485f77-b355-11e8-8be3-0f339ebbc2cc’]

१४ ) आयबी चौक
पर्यायी मार्ग – आय बी चौकाकडून कौन्सील हॉलकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सर्किट हाऊस चौकाकडे जाऊन इच्छितस्थळी जाणे

१५) मोरओढा चौक
पर्यायी मार्ग – – मोर ओढ्यातून कौन्सील हॉलकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सर्कीट हाऊस आयबी चौक मार्गे पुणे स्टेशन व इच्छितस्थळी जाणे

१६) ब्ल्यु नाईल हॉटेल चौक
पर्यायी मार्ग – ब्ल्यु नाईल हॉटेल चौकाकडून कौन्सील हॉलकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी किराड चौक व एसबीआय हाऊसकडे जाऊन इच्छितस्थळी जाणे

१७) किराड चौक
पर्यायी मार्ग – किराड चौकाकडून साधू वासवानी पुतळ्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी ब्ल्यु नाईल चौक पुढे एसबीआय हाऊसकडे जाऊन पुढे इच्छितस्थळी जाणे

१८) येरवडाकडून आयबी चौकाकडे जाणारी वाहतुक मंगलदास चौकात बंद करण्यात येईल
पर्यायी मार्ग – मंगलदास चौकातून सरळ जहाँगीर चौक मार्गे आरटीओ चौकाकडून इच्छितस्थळी
[amazon_link asins=’B01951R2S2,B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16db41c0-b355-11e8-afd1-45fa9a99f650′]

१९) येरवडाकडून आयबी चौकाकडे जाणारी वाहतुक मंगलदास चौकात बंद करण्यात येईल
पर्यायी मार्ग – मंगलदास चौकातून सरळ जहाँगीर चौक मार्गे आरटीओ चौकाकडून इच्छितस्थळी

२०) जहाँगीर हॉस्पीटल चौक, मंगलदास चौक मार्गे आयबी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येईल
पर्यायी मार्ग – मंगलदास चौकाकडून उजवीकडे वळून ब्ल्यु डायमंड चौकातून उजवीकडे वळून सर्किट हाऊस चौकातून इच्छितस्थळी
मोर्चा जाण्याच्या वरील मार्गावर मोर्चाचे वेळेपुरते सर्व प्रकारच्या वाहनांना पार्कींसाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच बंद रस्ते व त्यांना जोडणारे इतर लहान रस्ते वाहतुकीकरीता बंद करण्यात आले आहेत. तरी वाहन चालाकांनी मोर्चा जाणाऱ्या मार्गाचा वापर न करता पर्य़ायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.






महत्वाच्या बातम्या

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ‘कामकाज’ पाहणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा 

बनावट नाेटा टाेळीची पाळेमुळे पश्चिम बंंगालपर्यंत : एटीएस पथक सांगलीत दाखल

यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट 

कमर बाजवांचा बाजा मोदी वाजवणार का? : शिवसेना