नागपंचमीदिवशी शिराळामधील वाहतूक मार्गात बदल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शिराळा येथे नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी दि. 15 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी शिराळा शहरात होणारी गर्दी लक्षात घेता शिराळ्याकडे जाणार्‍या आणि येणार्‍या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आदेश दिले आहेत.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d0d9855-999a-11e8-b4cc-ef2160e6ffc0′]
नागपंचमीदिवशी शिराळा येथे राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक, यात्रेकरू येतात. त्याशिवाय शासकीय, खासगी व इतर वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे या वाहतुकीचा रस्त्यावर ताण पडून वाहतूकीला अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

दि. 15 ऑगस्ट रोजी दिवसभर पेठनाका येथून शिराळ्याकडे केवळ जाणार्‍या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिराळ्यातून राष्ट्रीय महामार्गाकडे येणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी, कार्वे, ढगेवाडी फाटा, ऐतवडे बुद्रुक फाटा, लाडेगाव, वशी, येडेनिपाणी फाटा या मार्गाने जातील. शिराळ्यातून पेठ नाक्याकडे जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.