इक्विटी फंडांत गुंतवणूक करण्याअगोदर ‘हा’ नियम जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  इक्विटी म्युच्युअल फंडांच्या युनिटची खरेदी अथवा विक्री आता दुपारी ३ वाजेपर्यंतच करता येणार आहे. भांडवल बाजार नियामक सिक्युरिटिज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी )कडून वेळेत बदल करण्यात आला आहे. निर्धारित केलेली वेळ सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांना लागू होणार आहे . तसेच डेट आणि हायब्रीड फंडांच्या ट्रेडिंगच्या वेळा पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत त्यामध्ये कोणता बदल करण्यात आला नाही. या पूर्वी सेबीकडून कोरोनाच्या काळात फंडांचा कट ऑफ टाइम दुपारी तीनवरून १२.३० पर्यंत करण्यात आला होता. लिक्विड आणि ओव्हरनाइट फंडांच्या खरेदी आणि विक्रीसाठी १२.३० ते १.३० पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. तर, डेट आणि हायब्रीड फंडांसाठी दुपारी १ वाजताची वेळ निश्चित केली होती. आंही महत्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडांच्या ट्रेडिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही.

कट ऑफ टाइम म्हणजे काय ?

नेट ॲसेट व्हॅल्यू हि एनएव्हीचे वाटप फंड हाउसकडे रक्कम आणि अर्ज कधी केला, यावर ठरते. या वेळेला फंडांच्या भाषेत कट ऑफ टाइम असे म्हटले जाते. लिक्विड, डेट आणि इक्विटी फंडांसाठी वेगवेगळी वेळ निर्धारित करण्यात येते. ग्राहकांना योजनेच्या युनिटचे वाटप ज्या दिवशी अर्ज केला, त्यादिवशी अथवा दुसऱ्या दिवशी करण्यात येते. युनिटची किंमत आणि वाटप हे नेमका अर्ज कधी केला आणि रक्कम कधी भरली यावर अवलंबून असते.

गुंतवणुकीवर परिणाम ?

ग्राहकांनी कट ऑफ टाइम चुकवून दुपारी तीननंतर अर्ज भरल्यास त्यांना त्याच दिवसाच्या एनएव्हीच्या आधारावर युनिटचे वाटप केले जाणार आहे. जर, ग्राहकांनी दुपारी तीनच्या आत अर्ज जमा केला असेल मात्र, रक्कम कट ऑफ टाइमपूर्वी जमा करण्यास उशीर झाला असेल तर तर संबंधितांना एक दिवस आधीच्या एनएव्हीच्या आधारावर युनिटचे वाटप केले जाणार आहे.