मतमोजणी (दि.२३) दिवशी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल ; जाणून घ्या काय आहेत ‘ते’ बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२३) होत आहे. पुणे शहरातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावुन येथे होणार आहे. मतमोजणी दरम्यान नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहनचालकांची गैरसोय होऊ नये आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

मतमोजणीच्या दिवशी या परिसरामध्ये अत्यावश्यक वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी पाच ते मतमोजणी संपेपर्यंत हा बदल असणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. तर काही रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे.

वाहतूकीसाठी बंद असलेले रस्ते खालील प्रमाणे

१) सेंट मिरा कॉलेज व अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रोडकडे येणाऱ्या वाहनांना लेन नं.१ पर्यंत प्रवेश देण्यात येईल. लेन नं. १ येथे डावीकडे वळुन इच्छीत स्थळी जावे. या ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात येणार आहे.
२) साऊथ मेन रोड लेन नं. ५,६ व ७ कडून साऊथ मेन रोडवर येणाऱ्या वाहनांना लेन नं. ४ पर्यंतच प्रवेश देण्यात येईल. लेन नं. ४ येथे उजवीकडे वळून इच्छीत स्थळी जावे.
३) आवश्यकते प्रमाणे सेंट मिरा कॉलेज समोर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन समोर व साऊथ मेन रोड लेन नं.५ येथे बॅरिकेटींग करण्यात येणार आहे.
४) साऊथ मेन रोड लेन नं. २ येथे प्लॉट नं. ३८ जैन प्रॉपर्टी समोर बॅरिकेटींग करून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
५) साऊथ मेन रोड लेन नं. ३ येथे बंगला नं. ६७ व ६८ या दरम्यान बॅरिकेटींग करून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
६) दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) ते लेन नं. ५ साऊथ मेन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूस बुधवारी (दि.२२) सकाळी ११ ते गुरुवारी (दि.२३) मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नो व्हेईकल झोन करण्यात आला आहे.
वाहन पार्कींग ठिकाणे
१) मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाहनांसाठी संत गाडे महाराज शाळेच्या आवारात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तर चारचाकी वाहने रोहिव्हिला गार्डन लोन नं. ७ कोरेगाव पार्क व माचवे अंध शाळा नॉर्थ मेन रोड लेन नं. १ जवळ या दोन मैदानावर पार्क करावीत.
२) मतमोजणी करता येणाऱ्या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व इतर नागरिक यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना रोहिव्हिला गार्डन लेन नं. ७ कोरेगाव पार्क व माचवे अंध शाळा नॉर्थ मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

You might also like