दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील वाहतूकीत बदल

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सोमवारी (दि.३) दहीहंडी असून शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड लक्ष्मीरोडवर सायंकाळी पाचनंतर दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षीत व सुरळीतपणे चालण्यासाठी पुणे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतुकीत बदल केले असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे. हे बदल सायंकाळी पाच ते दहीहंडी फुटेपर्यंत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
[amazon_link asins=’B00XKYDZUU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0368504b-adf9-11e8-86c2-f7071e03a192′]
वाहन चालकांनी बदल करण्यात आलेल्या मार्गाचा सायंकाळी पाच ते दहीहंडी फुटेपर्यंत वापर टाळून पर्य़ायी मार्गाचा वापर करावा. तसेच या मार्गावर फक्त अत्यावश्यक वाहने (फायरब्रिगेड, पोलीस वाहन, रुग्णवाहिका) सोडण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य़ करावे असे अावाहन करण्यात आले आहे.

वाहतुक व्यवस्थेत खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत…

शिवाजीनगर रोडवरुन स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस व चारचाकी वाहनांनी शिवाजीनगर येथील स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने पुढे मार्गस्थ व्हावे. तसेच तीनचाकी व दुचाकी वाहन चालकांनी आपली वाहने जिजामाता चौक व बुधवार चौक येथून पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जतील.
[amazon_link asins=’B073QFF2R1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c98384a-adf9-11e8-b7d3-a7846d9120e1′]
लक्ष्मी रोडने अलका टॉकीज चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोन्या मारुती चौकातून पुढे फडके हौद चौक येथून डावीकडे वळून जिजामाता चौक – बुधवार चौक-अप्पाबंळवंत चौक व केळकर रोडने पुढे मार्गस्थ व्हावे.

या भागातील वाहतूक परिस्थितीनुसार व आवश्यकते प्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. तरी वाहनचालकांनी सायंकाळी पाच ते दहीहंडी फुटेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी