वीर गोगादेव उत्सवानिमित्त पुणे कॅम्पातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे कॅम्पातील वीर गोगादेव उत्सवानिमित्त न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक शनिवारी (दि.२४) सायंकाळी सहाच्या सुमारास निघणार असून या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतूक शाखेने या ठिकाणच्या वाहतुकीत बदल केला आहे.

वीर गोगादेव मुख्य मिरवणूक मार्ग
न्यु मोदीखाना रोडने पुलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदीर, महात्मा गांधी रोडने डावीकडे वळुन कुरेशी मशिद समोरून सेंट्रल स्ट्रिट रोडने सरळ भोपळे चौक ते सेंट्रल स्ट्रिट चौक, उजवीकडे वळून महावीर चौक, महात्मा गांधी रोडने कोहीनुर हॉटेल चौक ते पुलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदिर येथे या मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे. तसेच या मिरवणुकीमध्ये लहान मिरवणूका देखील सहभागी होणार आहेत.

मिरवणूकीदरम्यान बंद करण्यात आलेले मार्ग आणि पर्य़ायी रस्ते
१. वाय जंक्शन वरून महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतुक ही वाय जंक्शन येथे बंद करून ती खाणे मारुती चौक येथे वळवण्यात आली आहे. तसेच सोलापूर रोडला जाणारी वाहतुक ही खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळून जाईल व शहरात येणारी वाहतुक ही खाणे मारुती चौकातून सरळ ईस्ट ट्रिट रोडने इंदीरा गांधी चौकातून डावीकडे वळून महावीर चौक व तेथून पुढे एम.जी. रोड कडे जाईल किंवा इंदीरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलीस स्टेशन चौक व तेथून डावीकडे वळून तीन तोफा चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

२. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक ही बंद करून वाहतूक ही चुडामन तालिमकडे वळवण्यात येणार आहे.

३. होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रिट रोडने इंदीरा गांधी चौकातून पुढे सोडण्यात येईल.

४. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून वाहतूक एम.जी. रोडने नाझ चौकाकडे वळवण्यात येणार आहे.

५. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक ताबुत स्ट्रिट रोडमार्गे पुढे सोडण्यात येईल.

६. बाबाजान चौकाकडून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून वाहतूक शिवाजी मार्केटकडे वळवण्यात येणार आहे.

७. बाबाजान चौकाकडून कुरेश मस्जिदकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून वाहतूक निशांत टॉकीजकडे वळवण्यात आली आहे.

८. शिवाजीमार्केट कडून सेंटर स्ट्रिट चौकीकडे जाणारी वाहतूक तसेच कोळसा गल्लीकडून एमजी रोडकडे जाणारी वाहतूक परिस्थितीनुसार बंद करण्यात येणार आहे.

वाहन चालकांनी मिरवणूक सुरु झाल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत पर्य़ायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –