गणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सावासाठी मूर्ती खरेदी व प्रतिष्ठापनेच्या कर्यक्रमानिमित्त रविवार (दि. १ सप्टेंबर) आणि सोमवार (दि.२ सप्टेंबर) रोजी पुण्यातील मध्यवस्तीमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चालकांनी पर्यायी मार्गाची वापर करावा असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.

पुण्यामध्ये गणेमूर्तींचे स्टॉल डेंगळे पुल ते शिवाजी पुलाच्या दरम्यान, पालिकेजवळील श्रमिक भवनासमोरील अण्णआभाऊ साठे चौक, शनिवार वाड्याजवळील कसबा पेठ चौकी ते जिजामाता चौक, मंडईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. वाहतुक कोंडीमुळे गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याचे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

शहरातील बंद रस्ते आणि पर्य़ायी मार्ग
शिवजी रस्ता – गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. वाहन चालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो. बर्वे चौकातून डावीकडे न वळता सरळ जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौकामर्गे पुढे जावे. झाशीची राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूलमार्गे कुभारवेसकडे जाणाऱ्या चालकांनी खुडे चौकातून पालिकेसमोरील प्रीमियम गॅरेज चौक शिवाजी पूलमार्गे गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा.

वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
1.
वीर संताजी घोरपडे पथावर महापालिका वीजबिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा
2. कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान न्यायालयाच्या एका बाजूला
3. मंडईतील मिनर्व्हा व आर्य़न पार्किंग तळ
4. टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता
5. शाहू चौक (फडगेट पोलीस चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौकातील रस्त्याच्या डाव्या बाजूस
सिंहगड रोड

गणपती विक्री दरम्यान सावरकर पुतळा चौक ते समाधान भेट सेंटर रस्त्याचे दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरु राहील. मात्र, या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करून नयेत.

पार्किंग व्यवस्था
1.
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्य़ंत
2. जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस
3. निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन