पालखी सोहळा कालावधीत ठरावीक मार्गावरील वाहतूकीत बदल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कालावधीमध्ये ठराविक मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवार (दि.४) पासून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुर होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून दोन ते तीन लाख भाविक, वारकर देहूगाव या ठिकाणी सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. भाविकांच्या, वारकऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी ठरावीक मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल खालील प्रमाणे…

१) बुधवार (दि.४) रोजी रात्री आठ पासून देहुगावमध्ये दिड्यांची वाहने सोडून इतर वाहनांना  खंडेलवाल चौक, परंडवाल चौक, हॉटेल कॉर्नर, तळेगाव चौक या ठिकाणी वाहतुकीस बंद करण्यात आले आहे.
२) गुरुवारी (दि.५) जुना पुणे-मुंबई महामार्ग रात्री बारा पासून सेट्रल चौक ते भक्ती शक्ती चौक निगडी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना देहुरोड कात्रज बायपास रोडची पर्य़ायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांनी निगडी मार्गे कात्रज देहुरोड बायपास मार्गाचा वापर करावा.
३) गुरुवारी (दि.५) आळंदी मार्गे येणारी अवजड वाहतुक सकाळी आठ पासून तळवडे चौकातून निगडीकडे वळवण्यात आली आहेत.
४) शुक्रवारी (दि.६) देहुरोड मधील स्थानिक नागरिकांनी पुण्याकडे व मुंबईकडे जाण्यासाठी देहुरोड कात्रज बायपास रोडचा वापर करावा.

५) तळेगाव दाभाडे ते तळवडेकडे जाणाऱ्या तसेच आळंदीकडून तळवडे मार्गे तळेगाव दाभाडेकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी रिंगरोडचा वापर करावा.

भाविक व वारकरी यांच्याकरीता पार्किंग सुविधा

देहुरोड कडून देहुगावकडे येणाऱ्या दुचाकी व अवजड वाहनांसाठी सि.ओ.डी. डोपोच्या मागील बाजूस पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच तळेगाव दाभाडे कडून येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल कॉर्नरचया उजव्या बाजुस पार्किंग सुविधा करण्यात आली आहे.  तर आळंदीकडून येणाऱ्या वाहनांकरीता खंडेलवाल कंपनीच्या शेजारी विठ्ठलवाडी गायरानामध्ये पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. जड वाहनांसाठी मलनित्सारण केंद्र देहूगाव गायरान या ठिकाणी पार्किंग सुविधा करण्यात आली आहे.

बस थांबे
देहुरोड कडून जुना पुणे-मुंबई महामार्गाने येणाऱ्या एसटी बसेस व पीएमपीएमएल बसेस या राधाकृष्ण मंगल कार्यालय माळवाडी या ठिकाणी अधिकृत बस थांबा करण्यात आला आहे. तर आळंदी कडून येणाऱ्या एसटी बसेस व पीएमपीएमएल बसेस खंडेलवाल कंपनी समोरील भालेकर प्लॉट येथे अधिकृत बस थांबा करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे देहुगावमधील स्थानिक नागरिकांनी आपली वाहने सार्वजनीक रस्त्यावर लावली असतील तर ती कढून घ्यावीत तसेच पालखी मार्गात वाहने उभी करु नयेत. तसेच आवश्यकता नसेल तर आपली वाहने बाहेर काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संबंधीत बातम्या
पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल