बंगळुरू-मुंबई गाडीच्या मार्गात अठ्ठावीस दिवसांसाठी केला बदल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन- रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  इंद्रायणी एक्स्प्रेसनंतर आता २८ दिवसांसाठी मुंबई-बंगळुरू गाडीसह काही गाड्या रद्द (आंशिक) करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेच्या अनेक कामांमुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कारण यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे नियाेजन कोलमडत आहे.

सध्या सोलापूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला असल्याचे दिसत आहे इतकेच नाही तर, मध्य रेल्वेमधील विविध रेल्वे स्टेशनवर नूतनीकरणाचे कामही जोरात सुरु आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणाने गाड्यांच्या वेळेत बदल होत आहे तर कधी गाड्यांच्या मार्गात बदल केला जात आहे याहीशिवाय वेळ पडली तर गाड्या रद्दही करण्यात येत आहे. परंतु यापूर्वी प्रवाशांना याबाबत वेळोवेळी सूचनाही देण्यात येतात.

परंतु नेहमी होणाऱ्या या बदलांमुळे प्रवाशांचा नारजीचा सूर असल्याचं दिसत आहे. दुहेरीकरणाच्या कामामुळे मागील काही दिवसांपासून अनेकदा इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. आता ती सुरळीत सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने अनेकदा ब्लाॅक घेण्यात आल्याने इंद्रायणी एक्स्प्रेसलाही ब्रेक लागत आहे. याशिवाय गाड्यांच्या मार्गात आणि वेळेतही अनेकदा बदल करण्यात आला होता. सध्या मात्र ही सेवा सुरळीत सुरु आहे.

रेल्वे गाडीच्या थांब्यामध्ये बदलगाडी क्रमांक ११३०१ मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ही गाडी १९ जानेवारी ते १७ फेबु्रवारी २०१९ पर्यंत येलहनका जंक्शन ते बंगळुरू स्थानकापर्यंत धावणार नाही तर ती आपल्या  निर्धारित स्थानकापर्यंत न धावता मुंबई ते येलहनका जंक्शनपर्यंतच धावणार आहे.

गाडी क्रमांक ११३०२ बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस ही गाडी २० जानेवारी ते १८ फेबु्रवारीपर्यंत आपल्या निघणाऱ्या स्थानकापासून न धावता सदर गाडी येलहनका जंक्शन ते मुंबईपर्यंत धावणार आहे. ही गाडी बंगळुरू ते येलहनका जंक्शन स्थानकादरम्यान धावणार  नाही.

सोलापूर-हसन एक्स्प्रेसचा डबा वाढविला

सोलापूर-हसन एक्स्प्रेस या मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या एक्स्प्रेसला १ डबा वाढविण्यात आला आहे. या एक्स्प्रेसला आता एकूण २३ डबे असणार आहेत. आता या एक्स्प्रेसला २ ब्रेकयान, ११ स्लीपर, ४ जनरल, २ एसी-२ टियर-३ एसी, ३ टियर, १ एसी फर्स्ट एकूण २३ डबे असणार आहेत. हा बदल गाडी क्रमांक ११३११ ला २० जानेवारी २०१९ पासून तर गाडी क्रमांक ११३१२ ला २१ जानेवारीपासून बदल होणार आहे असेही समजत आहे.