‘मेरठ’चं नाव पंडित नथुराम गोडसे नगर होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगी आदित्यनाथ सत्तेवर येताच त्यांनी अनेक शहरांच्या नामकरणाचा सपाट लावला होता. अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशाच्या मेरठ या जिल्ह्याचे नाव बदलून पंडित नथुराम गोडसे नगर करा अशी मागणी केली जात होती. याच प्रमाणे गाझियाबाद आणि मुझफ्फरनगरचेही नामांतर करण्याबाबतचे अनेक प्रस्ताव पुढे आले आहेत.

या मागण्या लक्षात घेता राजस्व विभागाने तिन्ही जिल्ह्यांच्या जुल्ह्याधिकाऱ्यांचे याबाबत काय म्हणणे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याबाबत तीनही जिल्ह्याधिकाऱ्यांना राजस्व विभागाने पत्र पाठवून याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा असे सांगितले आहे. तसेच हापूड जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुअवैद्यनाथ यांच्या नावाने नामकरण करण्याची केलेली मागणी फेटाळून लावली आहे.

याबाबत वेळेवर तोडगा काढणे आवश्यक
अशा मागणीवर लवकर तोडगा काढला तर योग्य राहते नाहीतर ती मागणी धूळखात पडून जाते म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत मत विचारले असल्याचे माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मागणी नेमकी कोणी केली ? सांगणे मुश्किल
१ नोव्हेंबर रोजी मेरठमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचा एक भाग असल्याचा दावा करणार्‍या एका संघटनेने मेरठचे पंडित नथुराम गोडसे असे नामांतर करण्याची मागणी केली होती. परंतु, हा मुद्दा आपण कधीही उपस्थित केला नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष व्रताधर रामानुज जीयर स्वामी त्रिदंडीजी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही मागणी नेमकी कोणी किंवा कोणत्या संस्थेने केली हे सांगणे कठीण आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/