बदलत असाल तुमचा पत्ता तर कसे ट्रान्सफर कराल LPG Gas connection, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एक काळ होता जेव्हा गॅस सिलिंडरसाठी तासनतास रांग लावावी लागत होती. आता केवळ मिस्ड कॉल देऊन गॅस सिलिंडर बुक करू शकता. जर नवीन कनेक्शन हवे असेल तर आता हे सुद्धा खुप सोपे झाले आहे. काही कागदपत्रांसह जवळच्या गॅस डिस्ट्रीब्युटरकडे जायचे आणि काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. एकदा कनेक्शन जारी झाल्यानंतर ते तुमच्यासाठी अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून सुद्धा उपयोगी येते. जर तुम्ही तुमचे लोकेशन बदलले तर या स्थितीत ग्राहकानी काय करावे? याबाबत कोणते नियम आहेत.

ते जाणून घेवूयात-

जर नवीन कनेक्शन हवे असेल तर हे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे शक्य आहे. नव्या कनेक्शनमध्ये दोन गॅस सिलिंडर आणि एक रेग्युलेटर मिळतो. हिंदु्स्तान पेट्रोलियमच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दोन सिलिंडरची किंमत 2900 रुपये आणि रेग्युलेटरची किंमत 150 रुपये आहे. रबरची जी किंमत असते ती वेगळी द्यावी लागते. गॅस सिलिंडर भरलेला असेल तर त्याची सुद्धा वेगळी किंमत चुकवावी लागेल. यासाठी अ‍ॅड्रेस प्रूफची आवश्यकता असेल, ज्यासाठी रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, लँडलाइन नंबर बिल, पासपोर्ट, एलआयसी पॉलिसी, वोटर आयड सारखी कागदपत्र उपयोगी येऊ शकतात. आयडेंटिटी प्रूफसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट सारखी कागदपत्र आवश्यक आतात.

एका शहराच्या आत लोकेशन बदलल्यास

जर तुम्ही आपले लोकेशन बदलत असाल तर हे सुद्धा सोपे आहे. जर एका शहराच्या आत लोकेशन बदलत असाल तर या स्थितीत तुमचा सध्याचा डिस्ट्रीब्यूटर ई-कस्टमर ट्रान्सफर अ‍ॅडव्हॉइस जारी करेल. हा इश्यू डेटपासून तीन महिन्यांसाठ व्हॅलिड आहे. याच्या आधारावर नवीन लोकेशनचा डिस्ट्रीब्यूटर तुमचे नाव आपल्या लिस्टमध्ये सहभागी करेल. तुम्हाला नवीन गॅस सिलिंडर किंवा रेग्युलेटर खरेदी करण्याची आवश्यकता नसेल.

एका शहरातून दुसर्‍या शहरात ट्रान्सफर करताना

जर एका शहरातून दुसर्‍या शहरात ट्रान्सफर करत असाल तर सध्याचा डिस्ट्रीब्यूटर टर्मिनेशन व्हाऊचर जारी करतो. जर कस्टमरने सिलिंडर जमा केला तर त्यास सबस्क्रीप्शन व्हाऊचरवर जेवढे पैसे लिहिले आहेत, तेवढे रिफंड मिळेल. आपले डोमेस्टिक गॅस कंज्यूमर कार्ड सबमिट करायचे नाही. याच कार्डच्या आधारावर नव्या शहरात नवीन कनेक्शन घेऊ शकता.