मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या शुभारंभालाच गोंधळ ; वर्धा येथील सभेत फडकवला ‘बॅनर’

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून शुभारंभ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या वर्धा येथील सभेदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एका युवकाने बॅनर फडकवल्याने हा गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करताच हा युवक उभा राहिला आणि त्याने बॅनर फडकवत घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले.

गुरुवारी दुपारी अमरावती जवळच्या गुरुकुंज मोझरी यथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखून ही यात्रा सुरु झाली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ही यात्रा वर्ध्यात आली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस भाषण करण्यासाठी उभे राहिले असता एका युवकाने बॅनर फडकवला. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी गोंधळ होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून युवकाला ताब्यात घेतले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्धा येथील सभेत भाजपाच्या सरपंचाविरोधात बॅनर फडकवण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना प्रशांत घाडे या युवकाने सरपंचाविरुद्ध बॅनर फडकवण्याचा प्रयत्न केला. कैलास काकडे हे बाजार समितीच्या व्यापारी आणि सरपंच आहेत. त्यांनी बाजार समितीमध्ये आर्थिक घोटाळा केला आहे असे घाडे या तरुणाचे म्हणणे आहे. त्याची चौकशी करण्यात यावी अशी त्याने यावेळी मागणी केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री गिरीष महाजन खाली उतरून आले आणि त्यांनी वातावरण शांत केले.

आरोग्यविषयक वृत्त –