मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी, लोकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी देशातील अनेक भागात सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी यांची बिहारमधल्या गया येथे सभा संबोधित करीत होते. मोदी रॅलीला संबोधित करत असतानाच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीदरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत. ढिसाळ नियोजनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोदींनी एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गयामध्ये जनतेला संबोधित केलं. त्यावेळी सभास्थळी ठेवलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान काहींनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. रॅलीदरम्यान दोन गट एकमेकांना शिवीगाळ करत होते, त्यानंतर ते हाणामारीवर उतरले. म्हणून सभे जवळील परिस्थिती बिघडली. लोक खुर्च्या उचलून एकमेकांच्या दिशेनं फेकू लागले.

रॅलीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी एकमेकांच्या डोक्यात त्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या घातल्या. त्यानंतर काही जणांनी सभा स्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ सभेच्या स्थळावर येत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us