‘चप्पल फेक’ प्रकरणा नंतर ‘हिंदुस्थानी’ कमल हसनची हायकोर्टात धाव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूतील मदुरै येथे बुधवारी झालेल्या सभेत मक्कल निधि मय्यम (एमएनएम) पार्टीचे संस्थापक आणि ‘हिंदुस्थानी’ कमल हसन यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कमल हसन यांनी १२ मे रोजी, नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे विधान केले होते. तेव्हापासूनच भारतात दहशतवादाला सुरवात झाली, असे देखील हसन म्हणाले होते. यानंतर भाजप, अण्णाद्रमुक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा कमल हसन यांच्या विरोधात प्रदर्शने करत आहेत. कमल हसनला गांधीजीकडे पाठवण्याची धमकी हिंदू महासभेने दिली आहे.

यानंतर देखील कमल हसन त्यांच्या मतावर ठाम राहीले. ते म्हणाले कि, मी तर ऐतिहासिक सत्य बोललो होतो. वादविवाद निर्माण करणे हा माझा हेतू नव्हता. त्या विधानाचा कोणत्याही जाती धर्माशी संबंध नाही.

कमल हसन जामिनासाठी मद्रास हाय कोर्टात

गोडसे यांच्यावर केलेल्या विधानामुळे हसन यांच्या विरोधात अरावकुरिचि येथे एफआयआर दाखल करण्यात आला. हसन अंतिम जामिनासाठी मद्रास हाय कोर्टात गेले. या आधी हाय कोर्टात त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली होती. या याचिकेत कमल हसन यांच्या विरोधात दाखल केलेला खटला मागे घ्यावा अशी मागणी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like