महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप आमदाराला अटक, प्रचंड खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुमसरचे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना 16 सप्टेंबर रोजी महिला पोलिस अधिकार्‍यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली आज अटक करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदाराला अटक झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.


काय आहे प्रकरण ?
तुमसर बाजार समितीमध्ये 16 सप्टेंबरला कामगारांना सुरक्षा किट वाटप सुरु होते. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका गर्भवती महिलेला अशा परिस्थितीत घरी कशी जाणार अशी विचारणा केली. त्यावेळी शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषेचा उपयोग केला. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे याने महिला अधिकाऱ्यासोबत वाद घालत आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान, आमदार चरण वाघमारे त्या ठिकाणी आले. त्यांनी देखील महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

पीडीत महिला पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी (दि. 18) रात्री आमदार चरण वाघमारे आणि शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. अनिल जिभकाटे याने हात पकडून धक्का दिल्याचे तक्रीरीत नमूद करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध कलम 354, 353, 472, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आज आमदार वाघामारे यांना अट करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com