Charanjit Singh Channi | चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवीन मुख्यमंत्री, पहिल्यांदा राज्यात दलित नेत्याला संधी

चंडीगड : Charanjit Singh Channi | पंजाबमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावरून सुरू असलेल्या राजकारणानंतर अखेर रविवारी सायंकाळी चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री (Punjab New CM) असतील.

पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाब काँग्रेसच्या आमदार गटाचे नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. चन्नी यांच्या अगोदर पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेले सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव अंतिम झाल्याचे म्हटले जात होते, परंतु अखेरच्या क्षणी त्यांच्या नावाऐवजी चरणजीत सिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंजाबमध्ये प्रथमच दलित नेत्याकडे राज्याची सूत्रे सोपवण्यात आली आहे.

आमदार गटाच्या नेतपदी निवड झाल्यानंतर चन्नी, नवज्योत सिंह सिद्धू आणि हरीश रावत राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहचले. सुमारे अर्धातासाच्या भेटीनंतर चन्नी यांनी माहिती दिली की सोमवारी सकाळी 11 वाजता शपथग्रहण सोहळा होणार आहे, ज्यामध्ये ते सीएम पदाची शपथ घेतील.

Web Title : Charanjit Singh Channi | punjab new cm charanjeet singh channi elected leader of congress legislature party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update