चार धाम यात्रा प्रकल्पातील नुकताच बांधलेला रस्ता पावसाने झाला खराब

टिहरी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उत्तराखंड राज्यातील चार धाम (Chardham project) यात्रेतील रस्ते चौपदरी करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत बांधण्यात आलेला टिहरी जिल्ह्यातील रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा महामार्ग (Chardham project) बंद करावा लागला आहे.

ऋषिकेश गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील (Rishikesh Gangotri NationalHighway) चंबा येथील नव्याने बांधलेला रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. तर काही ठिकाणी रस्त्याला मोठ मोठे तडे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे धोकादायक झाल्याने पोलिसांनी हा महामार्ग बंद केला आहे.

 

 

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशा चार धाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दरवर्षी येत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग विभागाने चार लेनचे ९०० किमी लांबीचे रस्ते बांधणीस सुरुवात केली आहे. हे रस्ते कमीतकमी १० मीटर रुंद करण्यात येणार आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी भूमिपूजन केले होते.

याप्रकल्पाअंतर्गत ऋषिकेश ते गंगोत्री या १४४ किमी महामार्गावरील रस्त्यांची या वर्षी बांधणी करण्यात आली होती.
मात्र, नुकत्याच झालेल्या पहिल्या पावसात या रस्त्याची दुरावस्था झाल्याने महामार्ग बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
बॉर्डर रोड ऑरगनायझेशनला तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्याचे टिहरीचे एसडीएम यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा

 

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

 

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

 

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

 

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Chardham project | newly constructed road on Rishikesh-Gangotri National Highway 94 in Chamba was damaged due to rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update