आंथरूणावर ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कझाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका मुलीने आपला मोबाईल फोन चार्जिंगला लावला होता. मात्र त्याचा स्फोट झाला. त्यामध्ये या मुलीचा मृत्यू झाला असून अलुआ एसेटकिजी असे या 14 वर्षीय मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अलुआ एसेटकिजी हि झोपताना गाणे ऐकत होती. सकाळी घरातील उठले असता त्यांना हा प्रकार दिसला. तसेच तिच्याजवळ असलेल्या फोनचा स्फोट झाला होता.

बिस्तर पर रखे मोबाइल में विस्फोट, 14 साल की लड़की की मौत

पोलिसांनी सांगितले कि, फोन चार्जिंगला लावलेला होता. त्याचा स्फोट झाल्यामुळे मुलीच्या डोक्याला मोठी इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. फॉरेन्सिक अहवालात फोन जास्त गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मोबाईल फोन कोणत्या कंपनीचा होता, याचा मात्र कोणताही खुलासा केलेला नाही. मृत मुलीच्या अनेक मैत्रिणींनी यावर दुःख व्यक्त केलं आहे तसेच तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

Visit : Policenama.com