प्रेमप्रकरणातून भरदिवसा तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

प्रेमप्रकरणातून भरदिवसा ठाण्यातील आरटीअो आॅफिस रोड परिसरात प्राची झाडे या तरुणीवर आज (शनिवार) रोजी सकाळी 11 च्या सुमारास चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, आकाश पवार (वय-22) असे त्याचे नाव आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28385ff8-97e8-11e8-9366-eb389c840669′]

हा प्राणघातक हल्ला एकतर्फे प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात गंभीर म्हणजे यापूर्वी देखील आरोपीच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याचे वास्तव समोर आलं आहे. आरोपी आकाश पवार याला नारपोली पोलीसांनी ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आकाश हा काल्हेर येथे राहणार असून ठाण्यातील कोपरी कॉलनीत राहणाऱ्या प्राची झाडेशी त्याचे एकतर्फी प्रेम होते असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यातूनच हि हत्या झाली असावी. प्राची हि ठाण्यातील के. जी. जोशी कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होती.