‘पॅडमॅन’ ची निर्माती प्रेरणा आरोरावर १६ कोटींच्‍या फसवणुकीचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था – ‘रूस्तम’, ‘टॉयलेट’, ‘पॅडमॅन’ आणि ‘परी’ यासारखे चित्रपट प्रोड्यूस करणारी प्रेरणा आरोरावर मुंबई पोलिसाच्‍या आर्थिक गुन्‍हे शाखेने तिच्या विरोधात १७६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. प्रेरणा अरोरावर १६ कोटींच्‍या फसवणुकीचा आरोप  चित्रपट वितरक वाशु भगनानी यांनी केला आहे. तसेच क्रिअर्ज एंटरटेनमेंटविरोधात ही त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत प्रेरणाने म्‍हटले आहे की, ‘क्रिअर्ज एंटरटेनमेंटच्‍या कामाशी माझा काहीही संबंध नाही. पण मुंबई पोलिस आर्थिक गुन्‍हे शाखेच्या माहितीनुसार, ‘KriArj Entertainments च्‍या अधिकृत ट्विटर आणि इन्‍स्‍टाग्राम अकाउंटवर प्रेरणाचे नाव कंपनीची संस्थापक म्हणून दाखवण्यात येत आहे. याप्रकरणी, २४ हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्‍यात आले आहेत. वाशु भगनानी यांनी प्रेरणावर आरोप केला होता की, ‘फन्ने खाँ’ चित्रपटामध्‍ये वितरक म्‍हणून त्‍यांना योग्‍य क्रेडिट देण्‍यात आले नाही, जे ॲग्रीमेंटच्‍या विरोधात आहे.

याप्रकरणी वाशु भगनानी यांनी मुंबई हायकोर्टामध्‍ये एक याचिकाही दाखल केली होती. याचिकेमध्ये त्‍यांनी म्‍हटले होते की, त्‍यांनी दाखल केलेल्‍या तक्रारीनंतर पोलिस ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. प्रेरणाने प्रड्यूस केलेल्या चित्रपटामुळे यशस्वी निर्माती म्हणून तिची ओळखत निर्माण झाली होती. काहीदिवसापूर्वी केदारनाथ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि अभिनेता जॉन अब्राहम सोबत झालेल्या विवादामुळे प्रेरणा चर्चेत होती.