TRP घोटाळ्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीआरपी घोटाळ्याप्रकरणी (TRP scam ) मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने (सीआयू) न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र (chargesheet) दाखल केले आहे. या प्रकरणी क्राईम ब्रँचकडून आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आले आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रेटिंग एजन्सी ब्रॉडकस्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) ने हंसा रिसर्च ग्रुपद्वारे पोलिसांकडे गुन्हा नोंदविल्यावर हे प्रकरण उघडकीस आले होते. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचाही यात समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीनेही याप्रकरणी ईसीआर नोंदविला आहे. मुंबई पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडीनेही या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.