चुलत्याला विधानसभेचं तिकीट देण्यासाठी पठ्ठयानं चक्‍क गृहमंत्री अमित शाहांच्या नावाने ‘लेटर हेड’ बनविले

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणातील एका तरुणाने आपल्या काकाला भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी चक्क गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने खोटे लेटर बनवल्याचा प्रकार समोर आला आहे.

हरियाणातील चरखी दादरी येथील हा धक्कादायक प्रकार असून तरुणाने आपल्या काकाच्या उमेदवारीसाठी नकली लेटर बनवल्याचे समजले आहे. तरुणाने दादरी मार्केटमधील एका कंप्युटर शॉप मधून चाळीस रुपये देऊन हे लेटर बनवून घेतले होते. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

१० सप्टेंबर रोजी पोलिसांच्या गुप्तचर विभागाने गोपाळ आणि त्याच्या काकांना ताब्यात घेतले होते. पोलीस डी एस पींनी गृहमंत्री अमित शहा यांच्या नकली लेटरहेड बनवण्याच्या आरोपाखाली कलम 420, 467, 468, 471, 120 आणि 201 नुसार तक्रार दाखल केली आहे. आरोपीना रिमांडमध्ये घेतल्यानंतर ही सर्व माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी तात्काळ त्या कंप्युटर सेंटर वर छापा टाकून तेथील कंप्युटर आणि हार्ड डिस्क डब्यात घेतली आहे.

पोलिस चौकशीत असे उघडकीस आले आहे की आरोपींनी कंप्युटर केंद्राच्या ऑपरेटरजवळ फक्त 40 रुपयांमध्ये बसून बनावट लेटर हेड तयार केले होते. आरोपी गोपाळ यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याच्याशी संबंध असल्याचे आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. 2014 साली जय शहाला भेटलो असल्याचे आरोपीने सांगितले, परंतु पोलिसांनी त्याचे म्हणणे पूर्णपणे नाकारले आहे. नकली बनवलेल्या लेटरहेड मध्ये अमित शहा यांनी गोपाळच्या काकांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी विचार केला जावा अशी शिफारस करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like