‘लठ गाड़ दिया, धुम्मा ठा दिया’ ! वडिल महावीर यांच्यासह ‘दंगल’ गर्ल बबिता फोगाटचा आज भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील लोकसभेच्या विजयानंतर इतर राजकीय पार्ट्यांमधून बीजेपीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झाले आहे. हरियाणातील महावीर फोगाट आणि त्यांची कन्या बबिता फोगाट या सुद्धा बीजेबीमध्ये सामील होणार आहेत. दिल्लीच्या हरियाणा भवन एथे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

या आधी महावीर फोगाट हे ‘जननायक जनता पार्टी’मध्ये होते. JJP मध्ये त्यांना क्रीडा क्षेत्राचे प्रमुख पद देण्यात आले होते. JJP साठी ही खूप महत्वाची गोष्ट मानली जात होती मात्र आता फोगाट पिता पुत्री भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत.

कलम ३७० हटवल्याप्रकरणी बबिता फोगाटने केले होते समर्थन

कलम ३७० हटवल्याप्रकरणी बबिता फोगाटने समर्थन केले होते, यासंबंधी ट्विट करून बबिता म्हणाली होती, देशाला स्वातंत्र्य होताना मी पाहिलं नाही परंतु काश्मीरला ३७० आणि ३५A मधून स्वतंत्र मिळाले हे परम भाग्य आहे. भारत माता की जय. आणखी एका ट्विट मध्ये हरयाणवी मध्ये लिहिले  ‘लठ गाड़ दिया, धुम्मा ठा दिया.

हरियाणाच्या मुख्यमंत्रांच्या समर्थनार्थही बबिताने ट्विट केले होते यात ती म्हणते मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही ज्यामध्ये  ते माता बघिणींबद्दल काही चुकीचं बोलले असतील त्यामुळे माझी मीडियाला प्रार्थना आहे की त्यांच्या विधानाला चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवू नका.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like