Charmakar Community | पुरेसे राजकीय प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी चर्मकार समाजाने संघटित ताकद दाखवावी, पुण्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | चर्मकार समाजाचे (Charmakar Community) संघटन करून आपली ताकद राजकीय पक्षांना दाखवल्याशिवाय कोणताही पक्ष तुमचा विचार करणार नाही. यासाठी संघटन करून वेळ पडली तर स्वत:चा झेंडा तयार करून या झेंड्याखाली सर्व चर्मकार समाज एकत्रित झाला पाहिजे. याशिवाय चर्मकार समाजाला राजकीय हक्काचा वाटा मिळणार नाही, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Congress City President Ramesh Bagwe) यांनी सांगितले. चर्मकार समाज व्यापारी मेळावा पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह (Lokshahir Annabhau Sathe Natyagriha) येथे नुकताच पार पडला. या मेळाव्यात सर्व पक्षांच्या शहर प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले (Charmakar Community)

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) म्हणाले,
चर्मकार समाजाचे सक्षम उमेदवार त्यांची नावे आम्हाला सांगावीत.
आम्ही त्याबाबतीत योग्य विचार करून वरिष्ठांकडे आपल्या समाजाची मागणी मान्य करून घेऊ.
शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख यांनी सांगितले, शिवसेना हि जात (Caste) धर्म (Religion) निरपेक्ष असून चर्मकार समाजाला जास्तीचे राजकीय वाटा आमच्याच पक्षांनी दिला आहे. यापुढेही देत राहू असे जाहीरपणे सांगितले.
यावेळी चर्मकार शक्ती मंचच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्त्यांना विविध पक्षाकडे उमेदवारी मिळावी.
चर्मकार समाजाचे संत शिरोमणी रोहिदास महाराज (Sant Shiromani Rohidas Maharaj) यांचे उचित स्मारक व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Charmakar Community)

या मेळाव्याला पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More) व गजानन थरकुडे (Gajanan Tharkude),
आरपीआय चे शैलेश चव्हाण (RPI Shailesh Chavan), आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party)
चे शहर निवडणुक प्रचार प्रमुख घनश्याम मारणे (Ghanshyam Marane), बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party)
चे पुणे शहर अध्यक्ष हुलगेश चलवादी (Hulgesh Chalwadi), कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन कुराडे, राजेश पवार,
सुभाष बापू पवार श्रीरंग अबनवे, विलास चव्हाण यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

चर्मकार शक्ती मंच यांच्या माध्यमातून चर्मकार समाजाचा राजकीय वाटा, हक्क आमच्या समाजाला मिळालाच पाहिजे अशी मागणी केली.
उपस्थित सर्वच पक्षाच्या शहराध्यक्षांनी यावेळी चर्मकार समाजाचा राजकीय वाटा नक्कीच दिला जाईल व पुणे शहरात भव्य असे संत रोहिदास स्मारकाची उभारणी केली जाईल अशी हमी दिली.

 

रमेश बागवे, प्रशांत जगताप, संजय मोरे, गजानन थरकुडे ,दुर्गेश चलवादी, यांनी चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सातपुते यांनी केले.
सोमनाथ अप्पा शिंदे, नानासाहेब आबनावे, प्रा. शशिकांत सोनवणे, सुखदेव सूर्यवंशी, जगदीश पोटे, श्रीकुमार काळे, प्रवीण अबनावे,
राजाभाऊ तिखे, रवींद्र खैरे, संतोष टोणपे, प्रशांत कदम, सतीश वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सुरेश सोनवणे, कुंडलिक सोनवणे, दादा अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आभार राजाभाऊ पोटे यांनी मानले.

 

Web Title :- Charmakar Community | Charmakar community should show united strength to get adequate political representation appeals of political party leaders in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा