OMG ! ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीला सोशल मीडियाद्वारे केले लग्नासाठी प्रपोज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिणात्य सृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री चार्मी कौर हिने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्यासोबत दक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा क्रिश्नन दिसत आहे. चार्मीने शेअर केलेल्या फोटोत ती त्रिशाला किस करताना दिसत आहे. तिने या फोटोद्वारे त्रिशाला प्रमोज देखील केले आहे.

त्रिशाच्या वाढदिवसाला ही पोस्ट तिने सोशल मिडियावर शेअर करुन तिला प्रपोज केले आहे. यावर त्रिशाने मी तुझे प्रपोज आधीच स्वीकारले असल्याचे म्हणले आहे. त्रिशा आणि चार्मी या दोघींनी अनेक वेळा चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघींचे अनेकवेळा दक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आले होते. मात्र, यांनी आपल्या कामाकडे लक्ष देण्याचे ठरविले. त्रिशाचा जानेवारी २०१५ मध्ये चेन्नईतील वरुण मनियन याच्यासोबत साखरपुडा झाला होता. पण मे २०१५ मध्ये त्या दोघांनी साखरपुडा मोडला.

त्रिशा आणि चार्मी या दोघी सोशल मिडियावर खुप अ‍ॅक्टीव्ह असतात. अनेक फोटो, व्हिडिओ त्या शेअर करत असतात. चार्मीने फोटो शेअर करुन चाहत्यांना नाराज केले आहे. एका फॅनने त्यांना म्हटले आहे की, तुम्ही दोघी इतक्या सुंदर दिसता…. तरी तुम्ही एकमेकांशी लग्न का करत आहात….. मला काय म्हणायचे तुम्हाला नक्कीच कळाले असेल असे व्टिटला रिप्लाय केले आहे.