चारू सिन्हा बनल्या CRPF श्रीनगर सेक्टरच्या IG, पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला IPS

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशवाद्यांचे उच्चाटन करण्याची जबाबदारी आता महिला आयपीएसच्या खांद्यावर देण्यात आली आहे. सीआरपीएफने चारु सिन्हा यांना श्रीनगर सेक्टरचे इंस्पेक्टर जनरल (आयजी) बनवले आहे. चारु सिन्हा, पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांना सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरचे आयजी बनवण्यात आले आहे.

1996 बॅचच्या तेलंगना कॅडरच्या आयपीएस अधिकारी चारु सिन्हा आता सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या आयजी बनल्या आहेत. ही पहिली वेळ नाही की चारू सिन्हा यांनी एखादी कठिण जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी त्या सीआरपीएफ बिहार सेक्टरच्या आयजी होत्या आणि नक्षलवाद्यांविरूद्ध त्यांनी धडक मोहिम राबवली होती.

बिहारनंतर त्यांची बदली आयजी म्हणून जम्मूला करण्यात आली. जेथे त्यांचा कार्यकाळ दिर्घ आणि कौतुकास्पद होता. यानंतर सोमवारी त्यांची बदली श्रीनगर सेक्टरमध्ये करण्यात आली.

सीआरपीएफचे सध्याचे डायरेक्टर जनरल (डीजी) एपी माहेश्वरी सुद्धा 2005 मध्ये श्रीनगर सेक्टरचे आयजी होते. या सेक्टरची सुरूवात 2005 मध्ये झाली होती. आतापर्यंत कधीही येथे आयजी म्हणून महिला अधिकारी तैनात झालेली नाही. या सेक्टरचे काम दशहतवादविरोधी अभियान लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने तडीस नेण्याचे आहे.

सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीरचे तीन जिल्हे बडगाम, गांदरबल आणि श्रीनगर आणि केंद्र शासित प्रदेश लडाख येतात. या सेक्टरमध्ये 2 रेंज, 22 कार्यकारी युनिट आणि तीन महिला कंपनी येतात. याच्याशिवाय श्रीनगर सेक्टरचे ग्रुप सेंटर-श्रीनगरवर प्रशासकीय नियंत्रण सुद्धा आहे.