Chasakman Dam | चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Chasakman Dam | जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा (Pune Rain) जोर कायम आहे. खडकवासलातून (Khadakwasla Dam) विसर्ग सुरू असून आता खेड तालुक्यातील चासकमान धरण (Chasakman Dam) ९० टक्के भरले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यामार्गे ४ हजार २९५ क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीला (Bhima River) करण्यात आला आहे. दरम्यान, भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

खेड तालुक्यात कळमोडी (Kalamodi Dam), चासकमान (Chasakman Dam), भामा आसखेड (Bhama Askhed Dam) अशी तीन धरणे आहेत. ११ जुलैला कळमोडी धरण १०० टक्के भरले, तर भामा आसखेड धरण ७८ टक्के भरले आहे. त्यानंतर आता चासकमान धरणही ९० टक्के भरले आहे. गतवर्षी ५ ऑगस्टला चासकमान धरण भरले होते.

 

चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून भीमाशंकर (Bhimashankar), भोरगिरी (Bhorgiri),
कारकुडी (Karkudi), मंदोशी (Mandoshi), कुडे (Kude) परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
५१७ मिमी पावसाची नोंद झाली असून पाऊस (Pune Rain Update) कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तसेच नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे, नदीतील कृषिपंप काढून घ्यावेत, असे आवाहन चासकमान पाटबंधारे प्रशासनाने (Chasakman Irrigation Administration) केले आहे.

 

Web Title :- Chasakman Dam | chasakman dam is 90 percent full 4 thousand 295 cusecs discharge in bhima river

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar On Jayant Patil | ‘जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक’ – गोपीचंद पडळकर

 

Maharashtra Rains Update | राज्यात सर्वत्र ‘धो-धो’; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

 

Maharashtra Politics Palghar Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! पालघर जिल्ह्यातील खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात