नीलेश साबळे माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, छत्रपती संभाजी राजे कडाडले

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  – ‘चला हवा येऊ द्या’ च्या कार्यकृमात निलेश साबळे आणि संबंधित वाहिनीने राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला आहे. महाराजांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो, यापकरणाी नीलेश साबळे यांनी माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे असा इशारा छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी दिला आहे.

 

राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर केल्यापृकरणाी गैरकृत्याची जबाबदारी स्वीकारून माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी ट्वीटवर नमूद केले आहे. 11 मार्च 2020 रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर केल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाड यांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. त्यासाठी काहीही करावे असा होत नाही. यासंबंधी आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. प्रतिमांमध्ये महाराजांचा असा वापर करणे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजी राजे यांनी निषेध व्यक्त केला आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.