Chatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अद्दल घडवणाऱ्यास ‘मोफत गुवाहाटी ट्रिप’; राष्ट्रवादीचे जाहीर आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्या व्यक्तीला जो कोणी धडा शिकवेल, त्याला गुवाहाटीची सहल भेट म्हणून दिली जाईल, अशा मजकुराचे फ्लेक्स पुण्यात लागले आहेत. हे फ्लेक्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लावण्यात आले आहेत. मागील काही दिवसांत भाजपच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांवर (Chatrapati Shivaji Maharaj) अपमानकारक वक्तव्ये केली होती. त्यावरून राष्ट्रवादीने हा नवा उपक्रम राबविला आहे.

 

अनेक दिवसांपासून भाजपच्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अपमान केला आहे. शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधाने केली असल्याने राष्ट्रवादीने ही नवी शक्कल लढवली आहे. शहरातील अनेक भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (Pune NCP) हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. (Pune Political News)

“भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना जो कोणी पहिला व्यक्ती धडा शिकवेल, त्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी सहल आणि कामाख्या देवीचे दर्शन मिळेल,” असा मजकूर फ्लेक्सवर आहे. खाली टीपही देण्यात आली आहे. ही घोषणा कोणत्याही पद्धतीने बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देण्याकरिता नसून, छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याकरता आहे, अशी टीप खाली देण्यात आली आहे. (Chatrapati Shivaji Maharaj)

 

औरंगाबाद विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक झाले आहेत, असे म्हटले होते. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर शिवाजी महाराजांची तुलना वि. दा. सावरकर यांच्याशी केली होती. जशी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली तशी शिवाजी महाराजांनीदेखील औरंगजेब बादशहाची माफी मागितली होती, असे त्रिवेदी म्हणाले होते.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या चित्तथरारक आग्रा सुटकेची तुलना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीशी केली होती.
त्यामुळे शिवाजी महाराजांचे चाहते आणि प्रेमी नाराज झाले आहेत. त्यावरून वाददेखील पेटले आहेत.
राज्यपालांना नारळ देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

 

Web Title :- Chatrapati Shivaji Maharaj | ncp posters goes viral in pune maharashtra political news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा