Chatrapati Shivaji Maharaj | भाजपचे ढोंगी शिवरायप्रेम; भाजप किती तोंडी नाग? सामना अग्रलेखातून टीकेचा भडीमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप हा किती तोंडी नाग आहे? शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अपमान करूनदेखील यांच्या धमन्या शांत आहेत. आणि जे तलवार काढून पुढे आले आहेत, त्यांना अटक केली जात आहे. असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून म्हटले आहे. भाजपचे शिवाजी महाराजांवरील (Chatrapati Shivaji Maharaj) प्रेम हे नवे ढोंग आहे, असे सामनातून म्हटले आहे.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेच्या मुखपत्रातून समाचार घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून सर्व मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण महामहोपाध्याय आणि शिवशाहीर असल्याप्रमाणे डफावर थाप मारत आहे. राधाकृष्ण विखे पाटील कधी काळी म्हराठे मावळे होते. पण, आता भाजपमध्ये जाऊन त्यांना राज्यपालांचे समर्थन करावे लागत आहे. हा मराठ्यांचा देश आहे, या कल्पनेला यामुळे धक्का बसत आहे. भाजप किती तोंडी नाग आहे, यावर संशोधन करावे लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

 

गुजरात विधानसभा प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शंभर तोंडी रावण म्हटले. त्याचा फायदा भाजपचे नेते काँग्रेसविरोधी प्रचारात घेत आहेत. मोदींचा अपमान काँग्रेसने केला. मोदी गुजरातचे पुत्र आहेत, त्यामुळे गुजरातची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असे भाजप म्हणत आहे. तसेच महाराष्ट्रातील नेतेदेखील तेच म्हणत आहेत. पण, हा नियम महाराष्ट्राला लागू होऊ देत नाहीत. ज्याप्रमाणे मोदींचा अपमान हा देशाचा किंवा गुजरातचा अपमान आहे, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान आहे. पण महाराष्ट्रात भाजप अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटावरून वाद झाला. त्यामुळे आता नवीन इतिहास लिहावा लागतो की काय,
असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शौर्याची बीजे रोवली गेली.
स्वराज्याचा लढा साधा नव्हता. ते एक महान कार्य आणि शौर्य होते.
चारशे वर्षांनंतर त्या इतिहासावर संशोधन होऊन काय साध्य होणार आहे, असा प्रश्न सामनातून उपस्थित केला गेला आहे.

 

Web Title :- Chatrapati Shivaji Maharaj | shivsena saamana editorial slams bjp over chhatrapati shivaji maharaj and maharashtra politics news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा