जैन समाजाचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा : एम.एस.बीट्टा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे येथील सकल जैन समाजाच्या वतीने बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये “चातुर्मास महोत्सव-२०१९” चे आयोजन करण्यात आले असून देशभरातील जैन बांधवांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. यात ज्येष्ठ जैन मुनींच्या उपस्थितीत संस्कार शिबिर, स्वाध्याय शिबिर आणि बालसंस्कार शिबिर यांसह ध्यान योग साधना, प्रवचन असे कार्यक्रम होत आहेत.

हा महोत्सव १२ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यामध्ये जैन गुरु धार्मिक, अध्यात्मिक आणि विज्ञानविषयक प्रवचनांद्वारे सामाजिक उद्‌बोधन करत आहेत. तसेच ध्यान गुरु आचार्य प. पू. श्री शिवमुनिजी म.सा, युवाचार्य महेन्द्रऋषीजी म.सा. तसेच आत्मयोगी श्री शिरीष मुनिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सुरु झाला आहे.

जैन समाजाचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा

शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० च्या सुमारास भारतीय दहशतवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष व पूर्व युवा काँग्रेसचे अध्यक्ष एम एस बीट्टा यांनी भेट देत आचार्यांजीचा आशीर्वाद घेत सकल जैन समाजाला संबोधन केले. या वेळी एम.एस बीट्टा यांनी सर्व सकल जैन समाज हा दानशूर, अहिंसा प्रेमी असून तो भारताच्या विकासामधील महत्त्वाचा घटक आहे. यावेळी त्यांनी आवर्जून पंजाब मध्ये खलिस्तान दहशतवाद्यांकडून घडलेल्या घटनेचा उल्लेख करत आचार्यजीनी दहशतीच्या वातावरणात शांततामय पद्धतीने त्यांचा वावर प्रेरक होता. तसेच काश्मीरमध्ये कलम 370 हठवल्याबद्दल मोदीजींना धन्यवाद देत. भारत माता की जय या घोषवाक्यने कार्यक्रम देशभक्तीमय झाला. संबोधनाबद्दल त्यांनी सर्व सकल जैन समाजाचे आभार प्रकट केले.

हा चातुर्मास आयोजन विजयकांत कोठारी, पोपटलाल ओसवाल, विलास राठोड, बाळासाहेब धोका, मदनलाल बलदोटा, जुगराज पालरेशा, प्रकाश धारिवाल, राजेश सांकला, विजय भंडारी, आदेश खिंवसरा, अविनाश कोठारी यांच्यासह विविध संघाचे व संस्थेचे पदाधिकारी हा चातुर्मास यशस्वी करण्यासाठी काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like