खुशखबर ! कमी व्याजदरानं सर्वाधिक ‘स्वस्त’ लोन देत आहेत ‘या’ 5 बँका, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंदीच्या काळातून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि ग्राहकांची खरेदीक्षमता वाढवण्यासाठी सरकार आणि RBI वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बँकेनं गेल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटचा दर ०.३५ टक्क्यांनी घटवला होता. यावेळी रिझर्व्ह बँकेनं आदेश देत बँकांना बँकांनी रेपो रेट सारखं एक्सटर्नल बेंचमार्कनी आपला रेट लिंक करावा सांगितले होते. बँकांना व्याजदरांमध्ये घट करण्यास अप्रत्यक्षरीत्या सांगितले होते.

त्यानंतर बँकांनी बँकांनी आपला लोन रेट रेपो रेटशी लिंक केल्यामुळे व्याजदरात देखील घट झाली आहे. मात्र आता देखील बँका लोन MCLR (Marginal Cost Of Fund Lending Rate) च्या आधारावर देतात. नवीन पद्धतीनुसार आता बँक ग्राहकांना रेपो रेटनी लिंक्ड लोन घेण्यासाठी पर्याय देत आहेत. ही व्यवस्था जरी नवीन ग्राहकांसाठी असली तरी काही शुल्क देऊन जुने ग्राहक सुद्धा रेपो रेटच्या व्यवस्थेशी जोडले जाऊ शकतात. सर्वाधिक बँका १ वर्षाच्या MLCR वर लोण देतात. आम्ही याठिकाणी ६ महिने, १ वर्ष आणि २ वर्ष अशा लोन प्रकारांमध्ये स्वस्त लोन देणाऱ्या बँकांबद्दल माहिती देणार आहोत.

६ महिन्यांच्या MCLR वर लोन :
– या प्रकारांच्या कर्जामध्ये स्टेट बँकेचा (SBI) दर सर्वांत कमी आहे. एसबीआयचा ६ महिन्याचा MCLR केवळ ८ टक्के आहे.
– यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रल बँक, पीएनबी आणि यूनियन बँक या बँका येतात. त्यांचा ६ महिन्याचा MCLR दर ८.२ टक्के इतका आहे.
– यांनतर इलाहाबाद बँकेचा MCLR ८.५ टक्के इतका आहे.

१ वर्षाच्या MCLR वरील लोन :
-SBI बँकेचा १ वर्षाचा MCLR दर ८.१५ टक्के इतका असून १ वर्षाच्या MCLR वरील लोनप्रकारातही स्वस्त लॉनमध्ये स्टेट बँकच अव्वल आहे. १० सप्टेंबरला
SBI ने यात बदल केले होते
– या प्रकारात दुसऱ्या नंबरवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) येत असून त्यांचा १ वर्षाचा MCLR दर ८.३ टक्के इतका आहे.
– तिसऱ्या क्रमांकावरील बँका ८.३५ टक्के MCLR वर लोन देत असून यात बँक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बँक चा समावेश आहे.

२ वर्षाच्या MCLR वरील लोन :
– या यादीतही SBI च पहिले स्थान पटकावत असून या बँकेचा २ वर्षांचा MCLR देखील सर्व बँकांपेक्षा स्वस्त आहे. हा दर ८.२५ टक्के इतका आहे.
– यांनतर एचडीएफसी बँक आणि आयओबी तिसऱ्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा MCLR ८.६० टक्के आहे.
– यानंतर अ‍ॅक्सिस बँकेचा नंबर आहे. या बँकेचा २ वर्षांचा MCLR ८.६५ टक्के इतका आहे.