Budget 2020 : तुमच्या खिशावर परिणाम होणार, जाणून घ्या काय झालं स्वस्त अन् महाग ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात मध्यमवर्गींयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला. काही अटीनुसार 15 लाख रुपयांपर्यंतच्या इनकम टॅक्समध्ये मोठे बदल केले आहे. अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक वस्तू सेवा महागल्या आहेत, तर काही स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे काय स्वस्त आणि काय महाग हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

काय महागलं –

– मोबाइल फोन
– पंखा
– इंपोर्टेड चपला, बुट
– फर्निचर
– स्टेशनरी
– फ्रिज, एसी संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू
– तंबाखू, सिगारेट
– मेडिकल इक्विपमेंट
– घरगुती वस्तूंवर एक्साइज ड्यूटी वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे.
– वाहन आणि वाहनांच्या पार्टवर कस्टम ड्युटी लावण्यात आल्याने ते महागणार आहे.

काय होणार स्वस्त –

– घर स्वस्त होणार आहे, हाऊसिंग डेवलपर्सला टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे.
– न्यूजप्रिंट पेपर

आयकराचे 5 स्लॅब –
उल्लेखनीय म्हणजे आर्थिक मंदी असताना देखील सरकराने यंदाच्या आर्थिक वर्षात 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला आयकरापासून मुक्त ठेवले आहे. त्यामुळे 5 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्याकडून कर आकारला जाणार नाही. 5 ते 7.5 लाखापर्यंत उत्पन्न असल्यास 10 टक्के कर द्यावा लागेल. 7.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर आकारला जाईल. 10 ते 12.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाईल. 12.5 ते 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास 25 टक्के कर आकराण्यात येईल. 15 लाख आणि त्यापेक्षा आधिक उत्पन्न असल्यास 30 टक्के कर आकारला जाईल.

जर तुम्ही या नव्या दरानुसार टॅक्स भरणार असाल तर तुम्हाला 70 सवलतींचा लाभ सोडावा लागेल. पहिल्यांदा विमा, गुंतवणूक, घराचे भाडे, मेडिकल, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या फी अशा विविध 100 सवलती मिळत होत्या तर आता नव्या टॅक्स स्लॅबनुसार 70 सवलतींच्या लाभ मिळणार नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की 15 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना सूटीचा लाभ घेणार नाही. त्यांची आता वर्षाला 78 हजार रुपयांची बचत होईल.