Corona Test : 100 रुपयांत कोरोना चाचणी, 15 मिनिटात रिपोर्ट ! आले कोविड टेस्टिंगचे आणखी एक स्वस्त किट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना नियंत्रित करण्यासाठी रणनितीचा सर्वात सुरुवातीचा भाग आहे – जास्तीत जास्त टेस्टिंग. शनिवारी सुद्धा पीएम मोदी यांनी हाय लेव्हल मीटिंगमध्ये डोर टू डोर टेस्टिंगवर जोर देण्याबाबत म्हटले होते. परंतु यासाठी रास्त दरात चाचणी व्यवस्था आवश्यक आहे. अशावेळी मुंबईत विकसित करण्यात आलेले कोराना टेस्ट किट क्रांतिकारी भूमिका पार पाडू शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या मदतीने मुंबईचे स्टार्टअप पतंजली फार्माने एक रास्त दरातील किट तयार केले आहे. पतंजली फार्माद्वारे विकसित करण्यात आलेले हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर आणि सध्या उपलब्ध रॅपिड अँटीजन टेस्ट किटला पूरक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

100 रुपये खर्च, 15 मिनिटात रिझल्ट
मुंबईच्या या स्टार्टअपने जे स्वस्त रॅपिड अँटीजन टेस्ट किट तयार केले आहे, त्यामध्ये आयआयटी, मुंबईने सुद्धा मदत केली आहे. हे किट 100 रुपये प्रति सॅम्पलच्या किंमतीत चाचणी उपलब्ध करते. चाचणीचा रिपोर्ट सुद्धा 10 ते 15 मिनिटांच्या आत मिळतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा एक उपक्रम सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड-19 हेल्थ क्रायसिसने जुलै 2020 मध्ये कोविड-19 रॅपिड निदान विकसित करण्यासाठी स्टार्टअपचे समर्थन केले होते.

8-9 महिन्यात तयार केले चाचणी किट
पतंजली फार्माचे संचालक, डॉ. विनय सैनी यांनी एसआयएनई, आयआयटी मुंबईसोबत स्टार्टअपला इनक्यूबेट केले आणि 8-9 महिन्यांच्या आत संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसोबत उत्पादन विकसित केले. त्यांनी आवश्यक लायसन्ससाठी अर्ज केला आणि विविध केंद्रांमध्ये उत्पादनांचे मुल्यांकन आणि पडताळणी केली जेणेकरून त्याचा प्रभाव समजू शकतो आणि त्यामध्ये सुधारण करता येऊ शकते.

डॉ. विनय सैनी यांनी कोरोना चाचणी किट बाबत म्हटले की, कोविड-19 रूग्ण आणि वायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) च्या नमून्यांमध्ये आमच्या उत्पादनांची अंतरिम पडताळणी करणे एक अद्भुत अनुभव होता, ज्यामध्ये कोविड रूग्णांचे नासोफेरींजल स्वॅब होते. मी आमच्या टीमच्या सदस्यांसह मुंबईत विविध कोविड केंद्रांवर विकसित उत्पादनाच्या मुल्यांकनासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सोबत होतो.

पुढील महिन्यापासून टेस्टिंगचे वेगवान अभियान
स्टार्टअपने जून, 2021 च्या सुरुवातीला वेगाने कोविड-19 अँटीजन तपासणी सुरू करण्याची योजना बनवली आहे. रॅपिड कोविड-19 तपासणी (10 ते 15 मिनिटे) ग्रामीण भाग, डॉक्टरांचे क्लिनिक आणि अशा भागात जिथे पॅथोलॉजी आणि डायग्नोस्टिक लॅब उपलब्ध नाही, अशा ठिकाणी कोविड -19 च्या जलद निदानासाठी सहायक ठरेल. हे चाचणी किट स्वस्त आणि महामारीला नियंत्रित करण्यासाठी उपयोगी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.