‘या’ 9 देशांमध्ये भारतीय करन्सीची किंमत जास्त, स्वस्तात करू शकता परदेश दौरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परदेशात फिरण्याची इच्छा प्रत्येकाची असते, परंतु महाग असल्याने लोकांना आपल्या आवडीशी तडजोड करावी लागते. मात्र, अशाही अनेक जागा आहेत जिथे भारतीय करन्सीची किंमत जास्त असल्याने तुमच्या बजेटमध्ये ही ठिकाणे सहज येऊ शकतात. या ठिकाणी आपल्या पैशात तुम्ही आवड पूर्ण करू शकता. अशी ठिकाणे जाणून घेवूयात…

नेपाळ –
जर तुमच्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही कमी आहे तरी सुद्धा तुम्ही नेपाळची ट्रिप सहज करू शकता. नेपाळ भारताचा शेजारी आहे आणि येथून नेपाळसाठी अनेक बस सेवा चालतात. येथे 1 रुपयाचा एक्सचेंज रेट 1.60 नेपाळी रुपया आहे. येथे सुंदर पर्वत, मंदिरे आणि मठ सर्वांना आकर्षित करतात. येथे तुम्ही आपल्या बजेटमध्ये भरपूर शॉपिंग सुद्धा करू शकता.

श्रीलंका –
अनेक लोकांचे म्हणणे आहे की, भारतात केरळची ट्रिप श्रीलंकेच्या तुलनेत जास्त महाग आहे. येथे 1 रुपया 2.30 श्रीलंकन रुपयांच्या बरोबरीने आहे. येथे तुम्ही स्वस्तात दुप्पट मजा करू शकता. जर तुम्ही श्रीलंकेची ट्रिप प्लॅन करत असाल तर एला येथे जाण्यास विसरू नका. हे ठिकाण प्रत्येक पर्यटकांची पहिली पसंती आहे.

व्हिएतनाम –
भारतासाठी स्वस्त देशांच्या यादीत व्हिएतनामचे सुद्धा नाव आहे. येथे 1 रुपयाची किंमत 334.68 व्हिएतनामी दोंग आहे. येथे तुम्ही तुमच्या आवडीची भरपूर शॉपिंग करू शकता.

जपान –
जर तुम्हाला जपानचे सौंदर्य पहायचे असेल तर तुमची ही आवड सहज पूर्ण करू शकता. येथे 1 रूपयाची किंमत 1.60 जपानी येन आहे. जपानची ट्रिपसुद्धा तुम्ही स्वस्तात प्लॅन करू शकता.

हंगेरी –
अनेक लोकांना युरोप महागडे वाटते, परंतु असे नाही. येथील काही ठिकाणे अशी आहेत ज्यांचा खर्च तुम्ही सहज करू शकता. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये युरोप प्रवास करायचा असेल तर हंगेरीचे तिकिट बुक करा. येथे एक 1 रुपयाची किंमत 4.12 हंगेरियन फोरिंट आहे. तुम्ही येथे कमी पैशात सहज फिरू शकता.

इंडोनेशिया –
1 इंडोनेशियन रुपया 0.0048 भारतीय रुपयाच्या बारोबरीने आहे. लाँग ट्रिपवर जाणार्‍यांसाठी इंडोनेशिया एक आवडीचे ठिकाण आहे. तुम्हाला भारतापेक्षा सुद्धा स्वस्त आणि चांगल्या वस्तू इंडोनेशियामध्ये मिळतील. बालीचे अनोखे सौंदर्य आणि बीजचा आनंद येथे घेऊ शकता.

कोस्टा रिका –
नेचर लव्हर्ससाठी कोस्टा रिकाला जाणे एक स्वप्न असते, परंतु हे तुम्ही सहज पूर्ण करू शकता. हे ठिकाण इतके स्वस्त आहे की, येथील ट्रिप प्लॅन करण्यासाठी तुम्ही अजिबात विचार करणार नाही. येथे 1 रुपयाची किंमत 8.26 कोस्टा रिकन कोलोन आहे. येथे रेनफॉरेस्ट फिरण्याची आवड तुम्ही पूर्ण करू शकता.

कंबोडिया –
फिरण्याच्या दृष्टीने कंबोडियापेक्षा जास्त सुविधायुक्त आणि स्वस्त ठिकाण दुसरे कोणतेही नाही. येथे तुम्ही अनेक अ‍ॅडव्हेंचर सुद्धा करू शकता. येथे 1 रुपयांची किंमत 60 कम्बोडियन रिएल आहे. कमी किंमतीत तुम्ही कंबोडियाची एक अलिशान ट्रिप प्लॅन करू शकता.

मंगोलिया –
अ‍ॅडव्हेंचरची आवड असणार्‍या लोकांसाठी मंगोलिया एक ड्रिम डेस्टिनेशन आहे. मंगोलियाची संस्कृती अशी आहे जिथे गेल्यावर प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडतो. मंगोलिया इतके परडवणारे आहे की येथील ट्रिप तुम्ही अनेकदा करू शकता. येथे 1 रुपयाची किंमत 35.5 मंगोलियन टगरिक आहे.