Cheapest Home Loan Rate | खुशखबर ! ‘या’ 10 बँका देताहेत सणासुदीच्या काळात ‘स्वस्त’ गृहकर्ज, जाणून घ्या कुणाची ऑफर सर्वात स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Cheapest Home Loan Rate | सणासुदीच्या काळात तुम्हीसुद्धा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या दरम्यान अनेक बँकांसह हौसिंग फायनान्स कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी (Cheapest Home Loan Rate) केले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि एलआयसी हौसिंग फायनान्स (LIC Housing Finance) सर्वात स्वस्त गृहकर्ज ऑफर करत आहेत. घरांची मागणी वाढणे आणि सणाचा काळ असल्याने बँकांनी गहकर्जाचे दर कमी केले आहेत. हे दर मागील 10 वर्षातील सर्वात कमी दर आहेत. (Cheapest Home Loan Rate)

 

1. बँक ऑफ बडोदा (bank of baroda)

बँक बडोदाने 0.25 टक्के व्याजदर कमी करून 6.75 टक्केवरून 6.50 टक्के केला आहे. शिवाय झीरो प्रोसेसिंग फी आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ही योजना आहे.

2 कॅनरा बँक (canara bank)

बँकेने आपल्या एक वर्षाच्या एमसीएलआर दर 0.10 टक्के कमी करून 7.25 टक्के केला. नवीन दर 7 ऑक्टोबरपासून लागू आहेत.

3 DCB

डीसीबी बँकेने सुद्धा 6 ऑक्टोबरपासून एमसीएलआर दरात 0.05 टक्के कपात केली.

4 Yes Bank

ठराविक कालावधीत बॅक केवळ 6.7 टक्के दराने गृहकर्ज ऑफर करत आहे.

5 LIC Housing Finance

एलआयसी हौसिंग फायनान्सने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर कमी करून 6.66 टक्के केला आहे. हा दर 700 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणार्‍यांसाठी आहे. हा व्याजदर 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे.

 

6 HDFC

एचडीएफसीने 6.70 टक्के वार्षिक प्रारंभिक व्याजदर केला आहे. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

7 पंजाब नॅशनल बँक (PNB)

पीएनबीने 50 लाखांपेक्षा जास्तीच्या गृहकर्जावरील व्याजदर 0.50 टक्के कमी करत 6.60 टक्के केला आहे.

8 Kotak Bank

कोटक बँकेने 60 दिवसांसाठी गृहकर्जावर व्याजदर कमी करून 6.5% केला आहे.

9 SBI

एसबीआयने 6.70 टक्केच्या दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर दिली आहे.

10 कोटक महिंद्रा बँक (kotak mahindra bank)

कोटक महिंद्रा बँके सणासाठी व्याज दर 6.65 टक्केवरून कमी करून 6.50 टक्के केला आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर आहे.

 

Web Title  Cheapest Home Loan Rate | cheapest home loan rate offered by sbi bank bob yes bank canera bank lic housing finance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | नवरात्रीनिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन, 210 महिलांची तपासणी

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

DRDO Recruitment 2021 | डीआरडीओमध्ये विविध पदांवर भरती; जाणून घ्या सर्व काही