‘या’ सरकारी बँकनं SBI पेक्षा स्वस्त केलं Home Loan, जाणून घ्या कुठे आहे सर्वात कमी व्याज ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्ही सॅलरीड आहात आणि होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर युनियन बँक ऑफ इंडियाकडून लोन घेणे फायद्याचे ठरू शकते. युबीआयने सॅलरीड क्लाससाठी होम लोन दर कमी करून 6.7 टक्के केला आहे. साधारणपणे भारतीय स्टेट बँक अन्य बँकांच्या तुलनेत कमी व्याजदरावर लोन देते, असा समज असताना युनियन बँकने आपले होम लोनचे दर कमी केले आहेत. युनियन बँकेद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सॅलरीवाल्यांसाठी 30 लाख रुपयांपर्यंत होम लोन केवळ 6.7 टक्के व्याजाने मिळेल.

युनियन बँकने ठेवल्यात दोन अटी

बँकने यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे ग्राहकाचा क्रेडिट स्कोर कमीतकमी 700 असावा. तर दुसरी अट आहे होम लोन अर्जदार एक महिला असावी. जर एखादा ग्राहक 30 लाख रूपयांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपेक्षा कमी कर्ज घेत असेल तर त्याच्यासाठी व्याजदर 6.95 टक्के असेल. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 75 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या होम लोनसाठी सुरूवातीचा व्याजदर 7 टक्के आहे.

एसबीआय होम लोन रेट

सॅलरी घेणार्‍या पुरूष ग्राहकासाठी होम लोन व्याजदर 6.85 टक्के असेल. हा दर नॉन-सॅलरीड लोकांसाठी हा दर अगोदरच्या दराच्या बरोबरीने आहे. जर कुणी व्यक्ती भारतीय स्टेट बँकेतून 30 लाख रुपयांचे लोन घेत असेल तर यासाठी 6.95 टक्के दराने व्याजदर द्यावे लागेल. एलआयसी हौसिंग फायनान्सचे 30 लाख रुपयांचे लोन घेतल्यास 6.85 टक्केच्या दराने व्याजदर द्यावा लागेल. एलआयसी हौसिंग फायनान्सने मागच्या महिन्यात होम लोनचे व्याजदर रिवाईज केले आहेत.

याशिवाय बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा 30 लाख रुपयांच्या लोनवर 6.85 टक्के दराने व्याज मिळत आहे. प्रायव्हेट सेक्टरच्या एचडीएफसी बँकेत 6.95 टक्के दराने 30 लाख रुपयांचे होम लोन मिळत आहे. एचडीएफसी बँकेत या लोनसाठी अट आहे की, अर्जदार महिला असावी. या बँकमध्ये 30 ते 75 लाख रुपयांच्या होम लोनवर व्याजदर 7.2 टक्के आहे.

व्याजदर कमी होण्याचा अंदाज

या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाणेनिधी धोरण समितीची बैठक होणार आहे. बैठकीनंतर आरबीआय व्याजदर एक चतुर्थ टक्के कपातीची घोषणा करू शकते, असा अंदाज आहे. जर आरबीआयने अशी घोषणा केली तर आगामी व्याजदरात कपात होऊ शकते.

मार्चच्या अखेरच्या आठवडयात पहिल्यांदा लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लगेचच रियल इस्टेटमध्ये मंदी दिसून येत आहे. फ्लॅट्सच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. अशावेळी दुसर्‍या बँकेच्या ग्राहकांना आपले होम लोन ट्रान्सफर करणासाठी बँका गळ घालत आहेत.