फंड ट्रान्सफरच्या बहाण्याने फसवणूक करणारा सायबर क्राईमच्या जाळ्यात

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

फंड जमा झाला असून तो बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीने सांगवी येथील एका नागरिकाला अशाच प्रकारे ३९ लाख ३६ हजार ३०४ रुपयांना गंडा घातला होता. या गुन्ह्याचा तपास करुन पुणे सायबर क्राईम सेलने ही कारवाई केली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eece354f-925f-11e8-9fa8-c5655378b844′]

रमनकुमार झा (रा. कृष्णा गल्ली, रामलिला मैदान, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सांगवी येथील एका नागरिकाने सायबर क्राईम सेलकडे फिर्याद दिली होती. आरोपीला पुढील कारवाईसाठी सांगवी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपीने फिर्यादी यांना फोनद्वारे संपर्क साधून फंड जमा झाला असल्याचे सांगितले. फंड बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या बहाण्याने त्यांना रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगितली. पैसे जमा करुनही फंड जमा न करता त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादी यांनी पुणे सायबर क्राईम सेलकडे रमनकुमार झा याचे विरुद्ध फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असाताना पोलिसांनी संबंधीत मोबाईल कंपनी व बँकेत संपर्क साधून तांत्रीक माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी दिल्ली येथे असल्याचे समजले. सायबर क्राईम सेलच्या एका पथकाने दिल्ली येथे जाऊन रमनकुमार झा याला अटक केली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7f30fbc-925f-11e8-b53c-e53f84985130′]

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मंदा नेवसे, किरण औंटी, पोलीस कर्मचारी शिरीष गावडे, योगेश वाव्हळ, अतुल लोखंडे, ज्योती दिवणे यांच्या पथकाने केली.